हिरव्या पालेभाज्या जशा कोथिंबीर, पालक, मेथी यांना जास्त काळ टिकवण्यासाठी काही सोपे उपाय आहेत. पानांवरील ओलसरपणा काढून, प्लास्टिक पिशवीत किंवा एअरटाइट कंटेनरमध्ये ठेवल्यास त्या अधिक काळ ताज्या राहतात.
हिरव्या पालेभाज्या प्रत्येक हंगामात उपलब्ध असत. हिरव्या पालेभाज्या शरीराला तंदुरुस्त ठेवण्यास खूप मदत करतात. पण, जेव्हा हिरव्या पालेभाज्या सुरक्षित ठेवण्याचा प्रश्न येतो, तेव्हा अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. जर हिरवी कोथिंबीर, पुदिना किंवा पालक फ्रिजमध्ये तसेच ठेवले तर त्या भाज्या लवकर खराब होतात. आम्ही तुम्हाला काही असे टिप्स सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्ही हिरव्या पालेभाज्या जास्त काळ ताज्या ठेवू शकता.
जेव्हा तुम्ही दुकानातून हिरव्या भाज्या आणता, तेव्हा त्या ओल्या असतात. त्या ताज्या ठेवण्यासाठी पाण्याचा शिडकावा केलेला असतो. पालेभाज्या साठवण्यासाठी सर्वप्रथम त्यातील ओलसरता काढणे गरजेचे आहे. यासाठी तुम्ही पेपर टॉवेलचा वापर करू शकता. पानांतील ओलसरता संपल्यावर त्या प्लास्टिक पिशवीत भरून फ्रिजमध्ये ठेवा. अशा प्रकारे हिरव्या भाज्या १० ते १२ दिवसांपर्यंत ताज्या राहतील.
आणखी वाचा- कॉफीसोबत या पदार्थांचे सेवन करणे टाळा, अन्यथा…
कोथिंबिरीची पाने खूप नाजूक असतात. जर तुम्ही त्यांना तसेच पॅकेटमध्ये बंद करून फ्रिजमध्ये ठेवलं, तर ती लवकर खराब होऊ शकते. कोथिंबिरीला रेफ्रिजरेट करण्यापूर्वी तिची पानं तोडा आणि जाड देठ व मुळे काढून टाका.
जेव्हा कोथिंबिरीच्या पानांवरील ओलसरपणा पूर्णपणे सुकतो, तेव्हा तुम्ही त्यांना पॉलिथिनमध्ये बंद करून ठेवू शकता. जर तुम्हाला कोथिंबिरीला दीर्घकाळ ताजे ठेवायचे असेल, तर सुमारे ३-४ दिवसांनी पॉलिथिनमधील कोथिंबिरीची पाने काढून त्यांचा उरलेला ओलसरपणा पुसून पॉलिथिन बदलून पुन्हा फ्रिजमध्ये ठेवा. असे केल्याने कोथिंबिरीची पाने जास्त काळ हिरवीगार आणि ताजी राहतील.
आणखी वाचा- कोलेस्ट्रॉल, मधुमेहाच्या रुग्णांनी नाश्तामध्ये खा हे 5 फूड्स, रहाल हेल्दी
जर तुम्हाला मेथी किंवा पालकासारख्या पालेभाज्या जास्त काळ ताज्या ठेवायच्या असतील, तर एअरटाइट कंटेनरचा वापर करा. सर्वप्रथम पालक किंवा मेथीची पाने तोडा आणि पेपर टॉवेलच्या मदतीने पानांवरील ओलसरपणा पुसा. नंतर ही पाने टाइट प्लास्टिक कंटेनरमध्ये ठेवा आणि झाकण घट्ट लावा. असे केल्याने हिरवी पाने सुमारे ५ ते १० दिवसांपर्यंत ताजी राहतील.