मुंबई - शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवले तर ते दुप्पट, तिप्पट झाल्याचे अनेक उदाहरणे आहेत. आज आम्ही तुम्हाला एका अशा शेअरची माहिती देणार आहोत ज्याने ५ वर्षांत एका लाखाचे चौदा लाख केले आहेत.
शेअर बाजारातील गुंतवणूक ही आजकाल खूपच सामान्य बाब आहे. चांगल्या रिटर्नच्या आशेने, अनेक लोक सध्या शेअर बाजारात गुंतवणूक करतात. योग्य पद्धतीने आणि ठराविक रकमेची गुंतवणूक केल्यास, नक्कीच नफा मिळू शकतो असे तज्ज्ञांचे मत आहे. त्यासाठी दीर्घकालीन गुंतवणूक महत्त्वाची आहे.
26
शेअरने १३६३% रिटर्न दिला
शेअर बाजारात असे अनेक स्टॉक आहेत ज्यांमध्ये गुंतवणूक करून अनेकांनी भरपूर पैसे कमावले आहेत. अशाच एका स्टॉकबद्दल आज आपण बोलणार आहोत. हा स्टॉक ५२ आठवड्यांच्या उच्चांकी पातळी ६१९.४० रुपयांवर पोहोचला आहे. तर गेल्या ५२ आठवड्यांमधील सर्वात कमी किंमत २९५.२५ रुपये होती. आणि गेल्या पाच वर्षांत, या शेअरने १३६३% रिटर्न दिला आहे.
36
कोणता आहे हा स्टॉक?
ही एक नवरत्न कंपनी आहे. रेल विकास निगम लिमिटेड (Rail Vikas Nigam Limited). हा मुख्यतः एक सरकारी मल्टीबॅगर स्टॉक आहे. आणि याच शेअरने १ लाख रुपयांना १४ लाख रुपये बनवले आहेत. शिवाय, पुन्हा एकदा या स्टॉकच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. नुकतेच इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेडकडून या कंपनीला सिग्नलिंग आणि टेलिकम्युनिकेशन प्रकल्पासाठी एकूण १७८.६८ कोटी रुपयांचे ऑर्डर मिळाले आहेत.
या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये गुंतवणूक करून गुंतवणूकदारांनी मोठा नफा कमावला आहे. गेल्या पाच वर्षांत, या कंपनीच्या शेअरची किंमत १३६३% आणि गेल्या तीन वर्षांत ९४७% वाढली आहे. म्हणजेच, या कालावधीत २२.१५ रुपयांचा शेअर आता ३२४ रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. गुरुवारी, रेल विकास निगम लिमिटेडचा शेअर बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजमध्ये २.०५ रुपये म्हणजेच ०.६३% टक्क्यांनी घसरून ३२४.२० रुपयांवर बंद झाला.
56
आज १४.६३ लाख रुपये
या नवरत्न कंपनीचा शेअर गेल्या ५२ आठवड्यांच्या उच्चांकी पातळी ६१९.४० रुपयांवर पोहोचला आहे. आणि गेल्या ५२ आठवड्यांमधील सर्वात कमी किंमत २९५.२५ रुपये आहे. त्यामुळे जर कोणी पाच वर्षांपूर्वी, रेल विकास निगम लिमिटेडच्या शेअरमध्ये १ लाख रुपये गुंतवले असते आणि ती गुंतवणूक आजपर्यंत धरून ठेवली असती, तर त्यांच्याकडे आज १४.६३ लाख रुपये असते.
66
२०२६ मध्ये उत्पन्न २०२५ पेक्षा जास्त असेल
मात्र २०२५-२६ आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीच्या निकालानुसार, आरव्हीएनएलचा ४०% नफा कमी झाला आहे. तरीही कंपनीला आशा आहे की, २०२६ मध्ये त्यांचे उत्पन्न २०२५ पेक्षा जास्त असेल. दरम्यान, अँटिक स्टॉक ब्रोकिंग कंपनीने या शेअरला सेल रेटिंग दिले आहे. जे पूर्णपणे सध्याच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून आहे.
**सूचना**: बाजारातील गुंतवणूक ही जोखमीची बाब आहे. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.