3.5 कोटी तरुणांना होणार फायदा
पंतप्रधान मोदी म्हणाले, "देशाच्या तरुणांसाठी आज एक मोठी आनंदाची बातमी आहे. 15 ऑगस्टच्या शुभदिनी, देशासाठी आणि तरुणांसाठी 1 लाख कोटी रुपयांची योजना सुरू करत आहोत. आजपासून पंतप्रधान विकसित भारत योजना लागू केली जात आहे." या योजनेंतर्गत खासगी क्षेत्रात पहिली नोकरी मिळवणाऱ्या तरुणांना एकूण ₹15,000 पर्यंतची रक्कम दिली जाईल. नवीन रोजगार देणाऱ्या कंपन्यांनाही प्रोत्साहन रक्कम दिली जाणार आहे. ही योजना मुख्यतः उत्पादन (मॅन्युफॅक्चरिंग) क्षेत्रावर केंद्रित असेल.
पात्रता व प्रोत्साहन कसे मिळेल?
ही योजना दोन भागांमध्ये विभागलेली आहे.
भाग ‘क’ – पहिल्यांदाच नोकरी करणाऱ्यांसाठी
कर्मचारी भविष्य निधी संघटना (EPFO) मध्ये नोंदणीकृत, ज्यांना पहिल्यांदाच नोकरी मिळाली आहे, अशा तरुणांना ही रक्कम मिळेल.
एकूण ₹15,000 दोन हप्त्यांत दिली जाईल:
पहिला हप्ता – सहा महिने सेवा पूर्ण केल्यानंतर
दुसरा हप्ता – 12 महिने सेवा व आर्थिक साक्षरता कार्यक्रम पूर्ण केल्यानंतर
ज्यांचा मासिक वेतन ₹1 लाखांपर्यंत आहे, ते पात्र असतील.
भाग ‘ख’ – नियोक्त्यांसाठी (कंपन्यांसाठी)
जे नियोक्ते अतिरिक्त कर्मचाऱ्यांची भरती करतील आणि त्या कर्मचाऱ्यांनी किमान सहा महिने सेवा दिली असेल, त्यांना दर महिन्याला ₹3,000 पर्यंत प्रोत्साहन रक्कम दोन वर्षांसाठी दिली जाईल.
उत्पादन क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांना ही रक्कम तिसऱ्या व चौथ्या वर्षासाठीही मिळू शकते.
पात्रतेसाठी, EPFO नोंदणीकृत कंपन्यांनी
50 पेक्षा कमी कर्मचारी असतील तर किमान 2 अतिरिक्त कर्मचारी
50 किंवा अधिक कर्मचारी असतील तर किमान 5 अतिरिक्त कर्मचारी
सलग 6 महिने नोकरीत ठेवणे गरजेचे आहे.