SBI Hikes Interest Rates : गृहकर्जाच्या व्याजदरात वाढ, 1 ऑगस्टपासून लागू होणार नवे दर, वाचा सविस्तर माहिती

Published : Aug 17, 2025, 12:15 AM IST

मुंबई - घर घेण्याचा विचार करत आहात? तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने गृहकर्जाच्या व्याजदरात वाढ केली आहे. सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे... 

PREV
15
व्याजदर वाढवण्याचा निर्णय

देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने गृहकर्ज घेणाऱ्यांना धक्का दिला आहे. गृहकर्जाच्या व्याजदरात वाढ करण्यात आली आहे. १ ऑगस्टपासून हे नवे दर लागू झाले आहेत.

25
नवीन कर्ज घेणाऱ्यांना लागू

हे बदल फक्त नवीन गृहकर्ज घेणाऱ्यांसाठी लागू आहेत. आधीच कर्ज घेतलेल्या ग्राहकांवर याचा काहीही परिणाम होणार नाही. सिबिल स्कोअर आणि एक्सटर्नल बेंचमार्क लेंडिंग रेट (EBLR) च्या आधारावर हे व्याजदर ठरवण्यात आले आहेत.

35
कमी क्रेडिट स्कोअर असेल तर व्याजदर जास्त

SBI मध्ये गृहकर्जाचे व्याजदर आतापर्यंत किमान ७.५०% ते कमाल ८.४५% होते. नवीन बदलांनुसार, कमाल दर ८.७०% पर्यंत वाढला आहे. कमी क्रेडिट स्कोअर असलेल्यांना आता जास्त व्याजदर भरावा लागेल.

45
मार्जिन वाढविण्यासाठी घेतला निर्णय

SBI च्या म्हणण्यानुसार, गृहकर्जावरील मार्जिन वाढवणे हा या निर्णयामागचा मुख्य उद्देश आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील परिस्थिती आणि निधीचा खर्च वाढल्यामुळे व्याजदर वाढवणे आवश्यक होते, असे अंतर्गत सूत्रांनी सांगितले.

55
युनियन बॅंकेनेही केली आहे दरवाढ

SBI च्या या निर्णयामुळे इतर सरकारी आणि खाजगी बँकाही व्याजदर वाढवू शकतात. युनियन बँक ऑफ इंडियाने आधीच गृहकर्जाचा व्याजदर ७.३५% वरून ७.४५% पर्यंत वाढवला आहे. त्यामुळे देशभरात गृहकर्जावरील व्याजाचा बोजा वाढू शकतो.

Read more Photos on

Recommended Stories