Chapati Dough Storage : मळलेले पीठ खराब व्हायला किती वेळ लागतो हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. मळलेले पीठ खोलीच्या तापमानात ठेवल्यास ते 2 ते 3 तास चांगले राहते. तेच पीठ फ्रिजमध्ये ठेवत असाल तर त्याबाबत महत्त्वाची माहिती जाणून घ्या.
आजकाल अनेकजण सकाळ-संध्याकाळ दोन्ही वेळेस चपात्या खातात. त्यामुळे गरजेपेक्षा जास्त पीठ मळले जाते. दोन्ही वेळेस चपात्या करूनही पीठ उरल्यास ते लगेच फ्रिजमध्ये ठेवले जाते. दुसऱ्या दिवशी चपातीसाठी याचा वापर केला जातो. एवढेच नाही, तर अनेक महिला घाईत असतात. त्यामुळे सकाळचे टेन्शन थोडे कमी करण्यासाठी त्या आदल्या रात्रीच पीठ मळून दुसऱ्या दिवशी चपात्या करतात.
26
फ्रिजमध्ये उरलेले पीठ ठेवू शकतो का?
यामुळे काम नक्कीच सोपे होते. पण आरोग्यावर कोणतेही दुष्परिणाम होणार नाहीत याची काळजी घेणेही महत्त्वाचे आहे. पण फ्रिजमध्ये उरलेले पीठ ठेवणे सुरक्षित आहे का?, हे जाणून घेऊ.
36
12 ते 24 तासांच्या आत वापरा
सर्वात आधी, मळलेले पीठ खराब होण्यासाठी किती वेळ लागतो हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. मळलेले पीठ खोलीच्या तापमानात ठेवल्यास ते 2 ते 3 तास चांगले राहते. त्यानंतर त्यावर बॅक्टेरिया वाढू लागतात, असे आहारतज्ज्ञ सांगतात. जर तुम्ही तेच पीठ फ्रिजमध्ये ठेवत असाल, तर ते 12 ते 24 तासांच्या आत वापरावे. कारण फ्रिजमध्ये पीठ ठेवल्याने त्यावर बॅक्टेरिया वाढणार नाहीत असे नाही. यामुळे फक्त बॅक्टेरिया वाढण्याची प्रक्रिया मंदावते.
तसेच, पीठ फ्रिजमध्ये ठेवताना थोडी काळजी घ्यावी. ज्या डब्यात तुम्ही पीठ ठेवत आहात तो ओला नसावा. तसेच, ते कोणत्याही हार्ड मटेरियलमध्ये ठेवू नये. नाहीतर ते लवकर खराब होते.
56
पीठ काळे पडल्यास सावध रहा
सर्वात आधी फ्रिजमध्ये ठेवलेले पीठ तपासा. ते कुठेही काळे पडलेले नाही याची खात्री करा. जर पीठ काळे पडले असेल, तर ते खराब झाले आहे आणि खाण्यायोग्य नाही, असा त्याचा अर्थ होतो.
66
फ्रिजमधील पीठ लगेच वापरू नका
तसेच, फ्रिजमध्ये ठेवलेले पीठ लगेच वापरू नका. पीठ फ्रिजमधून काढल्यानंतर काही वेळ बाजूला ठेवा. खोलीच्या तापमानावर आल्यावर थोडे कोमट पाणी आणि थोडे तेल घालून 1-2 मिनिटे मळून घ्या. नंतर ते पुन्हा 10-15 मिनिटे झाकून ठेवा आणि मग चपात्या करा.