सुझुकी ई-ॲक्सेस vs एथर 450, कोणती इलेक्ट्रिक स्कूटर सर्वोत्तम आहे? ई-ॲक्सेस नुकतीच बाजारात दाखल झाली आहे. बाजारात उपलब्ध असलेल्या एथर 450 आणि ॲक्सेस स्कूटरचे मायलेज, किंमत आणि परफॉर्मन्स कसे आहेत?, हे वाचून घेऊयात.
सुझुकीने अखेर भारतीय इलेक्ट्रिक दुचाकी बाजारात प्रवेश केला आहे. सुझुकी ई-ॲक्सेस इलेक्ट्रिक स्कूटर भारतात 1.88 लाख रुपये एक्स-शोरूम किमतीत लॉन्च झाली आहे. पूर्वी स्टार्टअप्सचे वर्चस्व असलेल्या या सेगमेंटमध्ये आता आणखी एका विश्वसनीय कंपनीने प्रवेश केला आहे.
25
सुझुकी ई-ॲक्सेस vs एथर 450
भारतातील आघाडीची इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादक कंपनी एथरची 450 एपेक्स ही सुझुकी ई-ॲक्सेसची सर्वात मोठी स्पर्धक असेल. कोणती स्कूटर चांगली आहे हे जाणून घेण्यासाठी, सुझुकी ई-ॲक्सेस आणि एथर 450 एपेक्स यांच्यातील फरक जाणून घेऊ.
35
किमतीत काय फरक आहे?
सुझुकी ई-ॲक्सेसची किंमत एथर 450 एपेक्सपेक्षा थोडी कमी आहे. एथर 450 एपेक्सची एक्स-शोरूम किंमत 1,89,946 रुपये आहे. तर, सुझुकी ई-ॲक्सेसची एक्स-शोरूम किंमत 1,88,490 रुपये आहे.
सुझुकी ई-ॲक्सेसमध्ये 3.07 kWh बॅटरी आहे, जी 71 किमी प्रतितास वेगाने 95 किलोमीटरपर्यंतची रेंज देते असा दावा केला जातो. ही इलेक्ट्रिक स्कूटर 5.49 bhp पॉवर आणि 15 Nm टॉर्क निर्माण करते. तर, एथर 450 एपेक्समध्ये थोडी मोठी 3.7 kWh बॅटरी आहे, जी एका चार्जवर 157 किलोमीटरपर्यंत धावू शकते. तिचा टॉप स्पीड 100 किमी प्रतितास आहे. ही ईव्ही 9.38 bhp पॉवर आणि 26 Nm टॉर्क निर्माण करते.
55
परफॉर्मन्स
पॉवर आणि परफॉर्मन्सचा विचार केल्यास, एथर 450 एपेक्स ही सुझुकी ई-ॲक्सेसपेक्षा अधिक शक्तिशाली आणि स्पोर्टी आहे. सुझुकी ई-ॲक्सेस थोडी स्वस्त आहे, पण फक्त 1,456 रुपये जास्त किमतीत एथर 450 एपेक्स जे फीचर्स आणि परफॉर्मन्स देते, ते पाहता एथरला अधिक पसंती मिळते.