मुलींना 'बॅड बॉईज' का आवडतात: सुरुवातीला हे सर्व खूप छान वाटतं, पण नंतर अशा मुलांसोबत राहणं कठीण होतं. पण हा फक्त आकर्षणाचा खेळ आहे की यामागे काही खोल मानसिक कारण आहे?, हे जाणून घेऊया.
प्रेमाच्या बाबतीत बहुतेकजण मनाचं ऐकतात. हृदयाचं कोणी ऐकत नाही. अशा वेळी मनाचं बोलणं हृदयावर भारी पडतं. हा विषय का, तर मुली अशा मुलांनाच पसंत करतात ज्यांना त्यांचं कुटुंब, मित्र आणि समाज 'बॅड बॉईज' म्हणून ओळखतो.
28
यामागे मानसिक कारण आहे का?
धाडसी वृत्ती, आत्मविश्वासपूर्ण वागणं आणि आयुष्याला सिनेमासारखं पाहणारे मुलं. सुरुवातीला हे सर्व खूप छान वाटतं, पण नंतर अशा मुलांसोबत राहणं कठीण होतं. पण हा फक्त आकर्षणाचा खेळ आहे की यामागे काही खोल मानसिक कारण आहे?, हे जाणून घेऊ.
38
मुली का आकर्षित होतात?
लेखिका सीमा आनंद यांनी त्यांच्या पॉडकास्टमध्ये या रंजक प्रश्नावर मोकळेपणाने चर्चा केली आहे आणि मुली 'बॅड बॉईज'कडे का आकर्षित होतात हे स्पष्ट केलं आहे.
सीमा आनंद म्हणतात की, महिलांनी टॉक्सिक पुरुष किंवा 'बॅड बॉईज' कसे असतात हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. जोपर्यंत एखादी महिला अशा नात्याचा अनुभव घेत नाही, तोपर्यंत तिला ते कळत नाही. टॉक्सिक नाती एक प्रकारे धडा म्हणून काम करतात.
58
आपण गैरसमज करून घेतो
त्यांच्यात एक वेगळाच आत्मविश्वास असतो. सुरुवातीला त्यांचं वागणं, बोलण्याची पद्धत आणि बिनधास्त स्वभाव खूप आकर्षक वाटतो. कधीकधी आपल्याला वाटतं की, 'तो मनातून एक चांगला व्यक्ती आहे'. पण आपण थोडा गैरसमज करून घेतलेला असतो.
68
वेळेनुसार चित्र बदलतं
'बॅड बॉईज'सोबत राहताना हळूहळू आपल्यासाठी चित्र बदलू शकतं. जो व्यक्ती एकेकाळी कूल वाटायचा, तो आता चांगला वाटत नाही. त्याचा आत्मविश्वास गर्विष्ठपणात बदलतो. जेव्हा तुम्हाला जाणवायला लागतं की, हे नातं तुम्हाला एकत्र आणत नाही, तेव्हा हे घडतं.
78
प्राधान्यक्रम आपोआप बदलतात
सुरुवातीला लूक आणि आकर्षण मनाला जास्त जिंकतात. पण खरं नातं आदरावर टिकून असतं, असं पॉडकास्टमध्ये सांगितलं आहे. आदराचं महत्त्व समजायला थोडा वेळ लागतो. पण एकदा का तुम्हाला ते समजलं की, तुमचे प्राधान्यक्रम आपोआप बदलतात.
88
हेच खरे पार्टनर असतात
सीमा आनंद यांनी स्पष्ट केलं की, जेव्हा मुली टॉक्सिक नात्यातून बाहेर पडतात, तेव्हा त्यांना स्थिरता, आदर आणि भावनिक सुरक्षिततेचं महत्त्व कळतं. शांत, समजूतदार आणि आदर देणारे 'ग्रीन फ्लॅग' व्यक्तीच खरे पार्टनर म्हणून दिसू लागतात.