घरातील वस्तू वापरून चेहरा सुंदर बनवू इच्छिणाऱ्यांसाठी तांदळाचे पीठ एक वरदान आहे. चेहरा चमकदार ठेवण्यापासून ते सुरकुत्या दूर करून तरुण ठेवण्यापर्यंत, तांदळाचे पीठ त्वचेला अनेक फायदे देते.
घरातील वस्तू वापरून चेहरा सुंदर बनवू इच्छिणाऱ्यांसाठी तांदळाचे पीठ एक वरदान आहे. चेहरा चमकदार ठेवण्यापासून ते सुरकुत्या दूर करून तरुण ठेवण्यापर्यंत, तांदळाचे पीठ त्वचेला अनेक फायदे देते. चला तर मग, चेहऱ्यासाठी तांदळाचे पीठ वापरण्याच्या काही पद्धती आणि त्याचे फायदे जाणून घेऊया.
28
तांदळाच्या पिठाचा स्क्रबर -
यासाठी 1 चमचा तांदळाच्या पिठात थोडे पाणी घालून पेस्ट बनवा. या पेस्टने चेहऱ्यावर स्क्रब केल्यास तेलकटपणा, घाण आणि मृत पेशी निघून जातील. स्क्रब करताना चेहऱ्यावर जास्त दाब देऊ नका. हळूवारपणे स्क्रब करा, तेही फक्त 2-3 मिनिटे. स्क्रबरनंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. असे केल्याने चेहरा चमकदार होईल.
38
तांदळाचे पीठ आणि काकडीचा रस -
एक चमचा तांदळाच्या पिठात एक चमचा काकडीचा रस आणि लिंबाच्या रसाचे काही थेंब मिसळा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावून 15 मिनिटे तशीच ठेवा आणि नंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. हा फेस पॅक त्वचा स्वच्छ करतो आणि मुरुमे दूर करतो.
एका चमचा तांदळाच्या पिठात थोडी साखर मिसळून चेहऱ्यावर लावा. हलक्या हातांनी मसाज करा आणि थोडा वेळ तसंच ठेवा. नंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. यानंतर चेहऱ्यावर बर्फाने शेक द्या. असे केल्याने चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स आणि नाकाजवळची घाण निघून जाईल. तसेच चेहरा चमकेल.
58
तांदळाचे पीठ आणि मध -
एका चमचा तांदळाच्या पिठात दोन चमचे मध मिसळून त्याने मान आणि नाकाच्या भागावर स्क्रब केल्यास घाण निघून जाईल आणि त्वचा चमकदार होईल.
68
तांदळाचे पीठ आणि दही -
एका वाटीत 1 चमचा तांदळाचे पीठ, दही आणि कस्तुरी हळद एकत्र करून चेहऱ्यावर लावा. सुमारे 15 मिनिटे तसेच ठेवा. नंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा. हा पॅक चेहऱ्यावरील सुरकुत्या घालवून त्वचा घट्ट करतो आणि चेहरा तरुण ठेवतो. तसेच चेहऱ्याला चमक देतो आणि त्वचा मुलायम बनवतो.
78
तांदळाच्या पिठाने फेशियल -
तुम्हाला घरीच फेशियल करायचे असेल, तर तांदळाचे पीठ तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. यासाठी एक चमचा तांदळाचे पीठ, एक चमचा कस्तुरी हळद, थोडे मध आणि दूध एकत्र करून चेहऱ्यावर लावा. 10 मिनिटे तसेच ठेवून नंतर हळूवार मसाज करा. मग थंड पाण्याने चेहरा धुवा. त्यानंतर चेहऱ्यावर बर्फाचा क्यूब लावा. हे फेशियल तुमचा चेहरा चमकदार बनवेल.
88
मेकअप काढण्यासाठी तांदळाचे पीठ -
दिवसा केलेला मेकअप रात्री झोपण्यापूर्वी काढण्यासाठी तांदळाचे पीठ वापरता येते. यासाठी एका चमचा तांदळाच्या पिठात थोडे गुलाबजल मिसळून पेस्ट बनवा. ती चेहऱ्यावर लावून 5 मिनिटे ठेवा, नंतर हळूवारपणे चोळून थंड पाण्याने चेहरा धुवा. यामुळे मेकअप पूर्णपणे निघून जाईल आणि चेहरा चमकदार दिसेल.