काही मुले कितीही खाल्ले तरी बारीकच राहतात. तुमच्या मुलाचे वजन वाढत नसेल, तर नारळाचे दूध हा एक उत्तम उपाय आहे. यामुळे निरोगीपणे वजन वाढण्यास मदत होते.
अर्धी वाटी खोबरे किसून त्यात वेलची आणि किसलेला गूळ घालून वाटा. हे मिश्रण गाळून रोज मुलांना दिल्यास ३० दिवसांत मुलांचे वजन वाढलेले दिसेल.
नारळाचे दूध वजन वाढवते आणि पचन सुधारते.
यात मॅग्नेशियम, लोह असल्याने मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.
मुलांना रोज नारळाचे दूध दिल्यास ऊर्जा वाढते आणि चयापचय क्रिया सुधारते. यातील पोषक तत्वांमुळे इतर आरोग्य समस्यांचा धोकाही कमी होतो.
Marathi Desk 3