Republic Day 2025 Speech : येत्या 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा केला जाणार आहे. यावेळी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. अशातच प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेत झेंडा वंदनावेळी देण्यासाठी सोपे भाषण पाहूया.
Republic Day 2025 Speech : प्रत्येक वर्षी 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. मोठ्या उत्साहात आणि आनंदात प्रजासत्ताक दिनानिमित्त वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. राष्ट्रध्वज फडकवत त्याला वंदन केले जाते. अशातच शाळेच्या पटांगणात प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात देण्यासाठी सोपे भाषण पाहूया.
आदरणीय व्यासपीठ, पूज्य गुरुजनवर्ग, माझ्या सर्व मित्रमैत्रिणींनो, आज आपण प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने एकत्र जमलो आहोत. या मंगल दिनी आपणा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या मनापासून शुभेच्छा. यानिमित्ताने आज मी आपणासमोर जे मनोगत व्यक्त करत आहे ते आपण शांतपणे ऐकावे ही नम्र विनंती.
आज आपण आपल्या भारत देशाचा…… वा वर्धापन दिन साजरा करत आहोत. प्रजासत्ताक दिन हा आपला एक राष्ट्रीय सणच आहे दरवर्षी हा राष्ट्रीय सोहळा आपण 26 जानेवारी ला आनंदाने साजरा करत असतो.
26 जानेवारी 1950 ला आपल्या भारत देशाला संविधान लागू झाले. तेव्हापासूनच आपल्या भारत देशाला पूर्ण स्वतंत्र गणराज्य घोषित झाले. म्हणून 26 जानेवारी हा दिवस आपण दरवर्षीच राष्ट्रीय सण म्हणून साजरा करत असतो. आपल्या भारताची राजधानी दिल्ली येथे या सोहळ्याचं विशेष आयोजन केलं जातं. या शुभ दिनी आपल्या भारत देशाचे पंतप्रधान या सोहळ्यास उपस्थित असतात. याप्रसंगी सादर केलेली परेड हे या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण असतं. आपल्या देशाचे सर्व नागरिक हा सोहळा पाहून मंत्रमुग्ध होत असतात या सोहळ्यात भारताची सर्व खुबी आणि छबी दाखवण्याचा प्रयत्न असतो. प्रजासत्ताक दिन सर्व भारतीयांच्या मनातील राष्ट्रीय भावना राष्ट्रीय एकता व एकात्मता; राष्ट्रप्रेम वृद्धिंगत करतो.
आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी शहीद झालेल्या सर्व थोर नेत्यांचे शूरवीरांचे क्रांतिकारकांचे स्मरण यादिवशी सर्वांनाच होते. आपले प्रत्येकाचेच मन ह्या सर्व आठवणीने व देशप्रेमाने भारून जाते. या राष्ट्रीय सणाने सर्वत्र नवचैतन्य आपल्याला पाहावयास मिळते.
शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते… हा देश माझा याचे भान, जरासे राहू द्या रे, जरासे राहू द्या !!
!! भारत माता की जय !!
आणखी वाचा :
तिरंगा ध्वज फडकवण्याचे 10 प्रमुख नियम, प्रत्येक भारतीयाला माहिती हवेत
Republic Day 2025 स्पेशल तिरंग्याच्या रंगातील 5 स्वादिष्ट रेसिपी