Marathi

तिरंगा ध्वज फडकवण्याचे 10 प्रमुख नियम, प्रत्येक भारतीयाला माहिती हवेत

Marathi

तिरंग्याची लांबी-रुंदी

तिरंगा ध्वज हा लोकर, सूत, सिल्क किंवा खादीपासून तयार केलेला असावा. झेंडा आयताकार असायला हवा. लांबी आणि रुंदीचे प्रमाण ३:२ असे असावे. केशरी रंग खालील बाजूस ठेवून झेंडा फडकवू नये.

Image credits: Getty
Marathi

तिरंगा कधी अर्ध्यावर उतरवू नये

सूर्योदयापासून ते सूर्यास्तादरम्यान तिरंगा फडकविता येतो. तिरंगा कधीही जमिनीवर ठेवता येत नाही. झेंडा अर्ध्यावर ठेवून फडकवू नये. 

Image credits: Freepik
Marathi

झेंड्याचे नुकसान करू नये

झेंड्याचे कोणत्याही प्रकारचे नुकसान करू नये. तिरंग्याचा कोणताही भाग जळालेला असल्यास व तिरंग्याबद्दल अवमानकारक टिपण्णी केल्यास तीन वर्षांचा कारावास किंवा दंड अशी शिक्षा होऊ शकते.

Image credits: pexels
Marathi

तिरंग्याचा वापर

तिरंग्याचा व्यावसायिक वापर करू नये. तिरंग्याचा गैरवापर कुणी करत असेल, तिरंगा वस्त्र म्हणून वापरत असल्यास त्याचा अपमान मानला जातो. 

Image credits: Social media
Marathi

तिरंग्याचा वस्र म्हणून वापर करू नये

तिरंग्याचा गणवेश म्हणून वापर करू नये. जर एखादी व्यक्ती कमरेच्या खालीली वस्त्रासाठी तिरंग्याचा कापड म्हणून वापर करत असेल तर तो तिरंग्याचा अपमान आहे. 

Image credits: Social meda
Marathi

तिरंग्यावर लिहू नये

तिरंग्यावर कोणत्याही प्रकारची अक्षरे लिहू नयेत. विशेष प्रसंगी किंवा राष्ट्रीय दिन जसे प्रजासत्ताक दिन व स्वातंत्र्य दिनाला तिरंगा फडकविण्यापूर्वी त्यामध्ये फुलं ठेवू शकता. 

Image credits: Social media
Marathi

सजावटीसाठी तिरंग्याचा वापर करणे टाळा

एखाद्या कार्यक्रमात व्यासपीठावरील टेबल झाकण्यासाठी किंवा मंचाची सजावट करण्यासाठी तिरंग्याचा वापर करू नये.

Image credits: Social media
Marathi

तिरंगा फाटलेला नसावा

फडकविलेला तिरंगा त्याच स्थितीत कायम राहायला हवा. फाटलेला, मळलेला वा चुरगळलेला तिरंगा फडकवू नये. 

Image credits: Getty
Marathi

तिरंगा फडवण्याची जागा

तिरंगा एखाद्या मंचावर फडकवला असल्यास, वक्ता भाषण करत असताना तिरंगा त्याच्या उजवीकडे असणे आवश्यक आहे.

Image credits: Getty
Marathi

तिरंग्यासोबत अन्य झेंडा

अन्य झेंडा किंवा पताका राष्ट्रध्वजापेक्षा उंच किंवा त्याच्यावर किंवा त्याच्याबरोबर लावू नये.

Image credits: Getty

नागा साधूंची भस्म निर्मिती: एक रहस्य

January 23 History: त्या दुर्दैवी तारखेने 8.30 लाख लोकांचा जीव घेतला

मंगल पांडे यांचे १० प्रेरणादायी विचार

गर्भात शिशु काय विचार करतो? प्रेमानंद महाराजांकडून जाणून घ्या