कॅमेरा - या फोनच्या मागे f/1.8 अपर्चर असलेला ५० मेगापिक्सल्सचा सिंगल कॅमेरा (1080p/ 30 fps व्हिडिओ रेकॉर्डिंग) दिला आहे. तर सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी f/2.0 अपर्चर असलेला ८ मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा मिळतो. यात HDR, पोर्ट्रेट, नाईट मोड आणि टाइम-लॅप्स सारखे फीचर्स आहेत.
बॅटरी आणि इतर फीचर्स - फोनमध्ये ३३W फास्ट चार्जिंग सपोर्टसह ६,०००mAh ची दमदार बॅटरी दिली आहे. सुरक्षेसाठी साईड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आणि धूळ/पाण्यापासून बचावासाठी IP64 रेटिंग मिळते. कनेक्टिव्हिटीसाठी ड्युअल सिम, 5G, 4G LTE, ड्युअल बँड वाय-फाय, ब्लूटूथ 5.4, यूएसबी टाईप-सी पोर्ट आणि GPS सारख्या सुविधा आहेत. फोनचे वजन सुमारे २११ ग्रॅम असून आकार 171.56 x 79.47 x 7.99 मिमी आहे.