Raksha Bandhan : बहिणीला गिफ्ट देण्यासाठी हे 5 स्मार्टफोनचे पर्याय आहेत बेस्ट

Raksha Bandhan Gifts for Sister : येत्या 19 ऑगस्टला रक्षाबंधन साजरी केली जाणार आहे. यावेळी भावाकडून बहिणीला छानसे गिफ्टही दिले जाते. यंदाच्या रक्षाबंधनला बहिणीला एखादा नवा स्मार्टफोन गिफ्ट करण्याचा विचार करत असाल तर पुढील काही पर्याय नक्की पाहू शकता.

Chanda Mandavkar | Published : Aug 6, 2024 4:52 AM IST / Updated: Aug 06 2024, 10:25 AM IST
16
रक्षाबंधनासाठी बहिणीला खास गिफ्ट

रक्षाबंधनच्या दिवशी बहिणीला वेगवेगळ्या प्रकारचे गिफ्ट दिले जाऊ शकते. पण यंदाच्या रक्षाबंधनला बहिणीला दमदार स्मार्टफोन गिफ्ट करण्याचा विचार करत असल्यास ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉनवरुन खरेदी करू शकता. अ‍ॅमेझॉनवर Raksha Bandhan Gift Store च्या माध्यमातून काही स्मार्टफोनच्या किंमतीत भरघोस सूट आणि अन्य ऑफर्सही दिल्या जाता आहेत. याबद्दलच जाणून घेऊया सविस्तर..

26
Redmi 13 5G Black Diamond स्मार्टफोन किंमत आणि फीचर्स

रक्षाबंधनासाठी बहिणीला Redmi 13 5G Black Diamond स्मार्टफोन गिफ्ट करू शकता. हा स्मार्टफोन दोन वेरिएंट 6GB आणि 128GB मध्ये येतो. स्मार्टफोनसाठी नो-कॉस्ट इएमआयचा ऑप्शनही दिला आहे. फोनची मूळ किंमत 17,999 रुपये असून तुम्हाला तो 13,998 रुपयांना खरेदी करता येणार आहे. रेडमीच्या या स्मार्टफोनमध्ये 108 मेगापिक्सलचा कॅमेरा, पोट्रेट, नाइट मोड दिला आहे. याशिवाय फोनची स्क्रिन 17.24 सेमी एफएचडी प्लस 120Hz AdaptiveSync डिस्प्लेसह येणार आहे.

36
Redmi 12 5G Jade Black द्या गिफ्ट

स्लीक आणि स्लिम डिझाइन असणारा Redmi 12 5G Jade Black स्मार्टफोन बहिणीला गिफ्ट करू शकता. या स्मार्टफोनमध्ये काही कलर ऑप्शनही आहेत. फोनमध्ये 50 मेगापिक्सला ड्युअल कॅमेरा फिल्म फिल्टरसोबत मिळणार आहे. यामुळे दमदार फोटो काढता येतील. फोनमध्ये 5000mAh ची बॅटरीही दिली आहे. याचा रॅम 8GB पर्यंत वाढता येऊ शकतो.

46
बजेट अधिक असल्यास द्या Samsung Galaxy S24 5G AI Smartphone गिफ्ट

प्रीमियम डिझाइनसह येणारा Samsung Galaxy S24 5G स्मार्टफोन धमाकेदार आहे. यामध्ये सेल्फीसह रियर कॅमेराही दिला आहे. एवढेच नव्हे स्मार्टफोनमध्ये AI सपोर्टही मिळणार आहे. हा स्मार्टफोन खासगी वापरासह गिफ्ट देण्यासाठी बेस्ट आहे. पण तुमचे बजेट अधिक असल्यास नक्कीच सॅमसंग कंपनीचा हा स्मार्टफोन खरेदी करू शकता.

56
iQOO Z7 Pro 5G स्मार्टफोनचे फीचर्स आणि किंमत

3D कर्व्ड डिस्प्लेसह येणाऱ्या iQOO Z7 Pro 5G स्मार्टफोनला युजर्सने 4.3 रेटिंग दिली आहे. याचे वजन अत्यंत हलके असण्यासह ट्रेंडी लूकही देतो. iQOO Z7 Pro 5G स्मार्टफोनमध्ये 64MP आणि लाइट ओआयएस कॅमेऱ्यासह येणार आहे. 4K व्हिडीओ रेकॉर्डिंगसाठीही स्मार्टफोन बेस्ट आहे. केवळ 22 मिनिटांपर्यंत 50 टक्के चार्ज करू शकता.

66
Lava Agni 2 5G स्मार्टफोनचाही पाहा पर्याय

स्टायलिश लूक असणारा उत्तम स्मार्टफोन गिफ्ट करायचा विचार करत असल्यास Lava Agni 2 5G चा पर्याय पाहू शकता. यामध्ये 66W ची सुपरफास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे. याशिवाय क्यूपिडी टेक्नॉलॉजी शार्प ऑटोफोकस फीचर्स देण्यात आले आहे. फोनच्या फ्रंटला 16MP चा उत्तम कॅमेराही मिळणार आहे.

आणखी वाचा : 

महाराष्ट्र सरकारच्या महिलांसाठी 5 खास योजना, होणार मोठा फायदा

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी रेल्वेकडून विशेष गाड्या, पाहा वेळापत्रक

Read more Photos on
Share this Photo Gallery