कोण आहे ही मराठी अभिनेत्री? जिच्या सीरिअलला केला जान्हवी कपूरने सपोर्ट, जाणून घ्या सविस्तर

अभिनेत्री ऋतुजा बागवेने मराठी सिनेसृष्टीत अनेक नाटक, मालिका, चित्रपटांमध्ये काम केलंय. ऋतुजा आता हिंदी मालिकाविश्वात पदार्पण करतेय. ‘माटी से बंधी डोर’ ही हिंदी मालिका घेऊन ऋतुजा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे

Ankita Kothare | Published : May 27, 2024 4:08 PM IST / Updated: May 27 2024, 09:39 PM IST
18
कोण आहे ऋतुजा बागवे ?

आयपीएल संपताच आजपासून स्टार प्लस वर ऋतुजा बागवे आणि अंकित गुप्ता याची नवी मलिका सुरु होत आहे.या मालिकेच्या माध्यमातून ऋतुजा हिंदी मालिका विश्वात पदार्पण करणार आहे.

28
हे आहेत मुख्य भूमिकेतील कलाकार

या नव्या मालिकेत बिग बॉस फेम अभिनेता अंकित गुप्ता आणि मुख्य अभिनेत्री म्हणून मराठमोळी ऋतुजा बागवे दिसणार आहे.

38
या भूमिकेत दिसणार ऋतुजा

ऋतुजा बागवे या मालिकेत एक गावाकडील शेतकरी मुलगी असल्याची भूमिका साकारलेली दिसत आहे . प्रोमोवरून ऋतुजाने साकारलेल्या भूमिकेचे कौतुक केले जात आहे.

48
2008 साली ऋतुजाचे कलाविश्वात पदार्पण

रुतुजा बागवे ही एक प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील ते एक मोठे नाव आहे. त्याने 2008 मध्ये मराठी टीव्ही शो 'ह्य गोजिरवाण्या घरात'मधून करिअरची सुरुवात केली.

58
ऋतुजा याहि मालिका आणि सिरीयल मध्ये दिसली आहे

ऋतुजा बागवेच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, ऋतुजाने याआधी ‘नांदा सौख्य भरे’, ‘चंद्र आहे साक्षीला’ अशा अनेक मालिकांमध्ये प्रमुख भूमिका साकारली आहे. तर गेल्यावर्षी प्रदर्शित झालेल्या ‘लंडन मिसळ’ आणि ‘सोंग्या’ या चित्रपटांमध्ये ऋतुजा झळकली होती.

68
ऋतुजा हिंदी मालिका विश्वात नाव लौकिक करणार

ऋतुजा बागवे मराठी मालिकांमधून घराघरात पोहोचली आहे. तर तिने चित्रपटही केले आहेत.त्यामुळे नाटक,मालिका आणि चित्रपटानंतर आता ऋतुजा हिंदी मालिका विश्वात नाव लौकिक करणार आहे. त्यामुळे आता ऋतुजाचे चाहते सीरिअलच्या पहिल्या एपिसोडची वाट पाहून आहेत.

78
जान्हवी कपूरनेदेखील ऋतुजाच्या या मालिकेचा प्रोमो तिच्या सोशल मीडियावर शेअर

ऋतुजाची ही नवी मालिका आजपासून स्टार प्लस वाहिनीवर प्रसारित झाली आहे. या मालिकेच प्रमोशन सध्या दणक्यात झाले आहे. एवढच नव्हे तर बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूरनेदेखील ऋतुजाच्या या मालिकेचा प्रोमो तिच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे.

88
जान्हवीने प्रोमो शेअर करत शिखर परिहारच्या आईला दिल्या शुभेच्छा

जान्हवीने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर या मालिकेचा प्रोमो शेअर करत शिखर परिहारच्या आईला शुभेच्छा दिल्या आहेत. याला कॅप्शन देत जान्हवीने लिहिलं, “आता संध्याकाळी ७:३० वाजता तुमचं मनोरंजन सुरूच राहिल. जेव्हा मैदानाची माती सोडून तुमचं नात शेतीच्या मातीबरोबर जोडलं जाईल. नक्की बघा, ‘माटी से बंधी डोर’ उद्यापासून संध्याकाळी ७:३० वाजता स्टार प्लस आणि डिज्नी हॉटस्टारवर. 

Share this Photo Gallery