मुंबई - अँटिऑक्सिडंट्स, बॅक्टेरियाविरोधी आणि दाहक-विरोधी गुणधर्म डाळिंबाच्या सालीला नैसर्गिक आरोग्यवर्धक बनवतात. आयुर्वेदातही डाळिंबाचे महत्त्व सांगितले आहे. म्हणून आता डाळिंबाची साल फेकू नका. तिचा वापर करा. जास्तीत जास्त निरोधी राहा.
डाळिंब खाणं आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे हे आपण नेहमी ऐकतो. पण डाळिंब खाल्ल्यावर आपण साल फेकून देतो. पण तुम्हाला माहितीये का, डाळिंबाची साल ही फळाइतकीच गुणकारी आहे. आयुर्वेदात डाळिंबाच्या सालीचे अनेक औषधी गुणधर्म सांगितले आहेत. ही साल तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढवते, पोटाच्या समस्या दूर करते आणि त्वचेची काळजी घेते. यातील अँटिऑक्सिडंट्स, बॅक्टेरियाविरोधी आणि दाहक-विरोधी गुणधर्म हे सालेला नैसर्गिक आरोग्यवर्धक बनवतात. म्हणून आता डाळिंबाची साल फेकू नका. चला तर मग, डाळिंबाच्या सालीचे फायदे जाणून घेऊया.
26
हृदयाचे आरोग्य
डाळिंबाच्या सालीतील अँटिऑक्सिडंट्स आणि पॉलीफेनॉल रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करतात. वाईट कोलेस्ट्रॉल (LDL) कमी करून हृदयाला आतून स्वच्छ ठेवतात.
36
खोकला आणि घशाला खवखव
तुम्हाला नेहमी खोकला किंवा घशाला खवखव होत असेल तर डाळिंबाच्या सालीचा काढा किंवा पावडर आराम देऊ शकते. यात बॅक्टेरियाविरोधी आणि विषाणूविरोधी गुणधर्म आहेत, जे घशात साठलेला कफ कमी करतात आणि संसर्ग टाळतात.
डाळिंबाच्या सालीमध्ये भरपूर फायबर असते. हे पचनसंस्था निरोगी ठेवते. जुलाब, आम्लपित्त आणि पोटदुखीसारख्या समस्यांवर आराम देते. शिवाय, हे शरीरातील आतड्यांतील कृमी आणि विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते.
56
नैसर्गिक डिटॉक्स
डाळिंबाच्या सालीचे नियमित सेवन केल्याने शरीरातील साठलेले विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते. हे यकृत आणि मूत्रपिंड शुद्ध करते आणि रक्त शुद्ध करते, ज्यामुळे तुमची त्वचा चमकदार होते आणि रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते.
66
त्वचेसाठी फायदेशीर
डाळिंबाच्या सालीमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंट्स असतात, जे त्वचेचे फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण करतात. चेहऱ्यावरील डाग, सुरकुत्या आणि मुरुमे कमी करण्यासाठी ते प्रभावी आहे. सालीची पावडर बनवून फेस पॅक म्हणूनही लावता येते.