PN गाडगीळ यांचा IPO आज उघडणार, गुंतवणूकदारांनी वाचा या 5 खास गोष्टी

PN Gadgil IPO  Updates : आजपासून पुढील तीन दिवसांसाठी पीएनजी गाडगीळ यांच्या आयपीओमध्ये गुंतवणूक करता येणार आहे. या आयपीओला ग्रे मार्केटमध्ये उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

PN Gadgil IPO Updates : आज (10 सप्टेंबर) मार्केटमध्ये तीन आयपीओ उघडले आहेत. यामध्ये पीएन गाडगीळ, SPP Polymers आणि Trafilksol ITS Technologies च्या आयपीओचा समावेश आहे. यापैकी पीएनजी गाडगीळ हा मेन बोर्डाचा आयपीओ असून अन्य दोन एसएमई (SME) बोर्डाचे आयपीओ आहेत. सध्या पीएन गाडगीळ यांच्या आयपीओला ग्रे मार्केटमध्ये (Gray Market) गुंतवणूकदारांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहेत.

पीएन गाडगीळ ज्वेलर्स कंपनी काही प्रकारच्या ज्वेलरीमध्ये डील करतात. यामध्ये सोन, चांदी, प्लॅटिनम आणि डायमंडच्या ज्वेलरीचा समावेश आहे. याला शॉर्टमध्ये PNG ब्रँडने ओखळले जाते. कंपनीचे देशभरात 30 हून अधिक स्टोअर आहेत. कंपनीचे महाराष्ट्रात सर्वाधिक स्टोअर आहेत. पीएन गाडगीळ यांचे एक स्टोअर अमेरिकेत देखील आहे. या कंपनीच्या आयपीओसाठी येत्या 12 सप्टेंबरपर्यंत गुंतवणूक करता येणार आहे.

PN गाडगीळच्या आयपीओच्या 5 खास गोष्टी

कंपनीचे शेअर्स
पीएन गाडगीळ यांच्या आयपीओअंतर्गत 1100 कोटी रुपये उभारण्याची योजना आहे. कंपनीची इश्यू साइज 1100 कोटी रुपये आहे. कंपनी 850 कोटी रुपयांचे 1.7 कोटी फ्रेश शेअर आणि 250 कोटी रुपयांचे ओएफएसअंगतर्गत शेअर जारी करणार आहे.

प्रत्येक शेअरची किंमत
कंपनीच्या प्रत्येक शेअरची किंमत 456 रुपये ते 480 रुपये आहे. एका लॉटमध्ये 31 शेअर्स खरेदी करता येणार आहे. यासाठी 14,880 रुपये गुंतवावे लागणार आहेत. एक गुंतवणूकदार अधिकाधिक 13 लॉटसाठी आयपीओमध्ये गुंतवणूक करू शकतो.

लिस्टिंग कधी होणार?
आयपीओचे अलॉटमेंट 13 सप्टेंबरला होणार आहे. म्हणजेच शेअर्स कोणाला मिळणार आणि कोणाला नाही याबद्दल कळणार आहे. डीमॅट खात्यात 16 सप्टेंबरला क्रेडिट होणार आहेत. लिस्टिंग 17 सप्टेंबरला होणार आहे.

कंपनी आयपीओच्या रक्कमेचे काय करणार?
आयपीओच्या माध्यमातून उभ्या केलेल्या पैशांचा वापर कंपनी महाराष्ट्रात आणखी 12 स्टोअर सुरु करणे, कर्ज फेड आणि सामान्य कॉर्पोरेट उद्देशासाठी वापरणार आहे.

कंपनीची आर्थिक स्थिती
आर्थिक वर्ष 2023 मध्ये कंपनीचा रेवेन्यू वर्ष प्रति वर्ष 76 टक्क्यांनी वाढून 4507 कोटी रुपये झाला आहे. तर टॅक्सनंतर कंपनीचा नफा 35 टक्क्यांनी वाढून 94 कोटी रुपये झाला आहे.

आयपीओची ग्रे मार्केटमधील स्थिती
पीएन गाडगीळ यांच्या आयपीओला ग्रे मार्केटमध्ये उत्त प्रतिसाद मिळत आहे. मार्केट विश्लेषकांच्या मते, पीएन गाडगीळ ज्वेलर्स यांचा आयपीओ 50 टक्के प्रीमियम लिस्टवर खुलला जाऊ शकतो. अशातच गुंतवणूकदारांनाही पहिल्याच दिवशी 50 टक्क्यांचा नफा होण्याचा अंदाज आहे.

आणखी वाचा : 

IPhone 16 सीरीज लाँच: भारतात प्री-बुकिंग 13 सप्टेंबरपासून, जाणून घ्या किंमत

Bajaj Housing Finance IPO : ४ तासातच IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या

Share this article