शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली! PM किसानच्या २२ व्या हप्त्याची तारीख कन्फर्म; 'या' दिवशी खात्यात पडणार २ हजार रुपये!

Published : Feb 15, 2026, 08:38 PM IST

PM Kisan 22nd Installment: पीएम किसान योजनेचा २२ वा हप्ता २४ फेब्रुवारी २०२६ रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. हप्ता मिळवण्यासाठी e-KYC, भू-सत्यापन, आधार लिंकिंग आणि फार्मर आयडी यांसारख्या अटी पूर्ण करणे आवश्यक आहे. 

PREV
16
बळीराजासाठी खुशखबर! 'पीएम किसान'चा २२ वा हप्ता 'या' दिवशी होणार जमा

PM Kisan 22nd Installment: देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. बहुप्रतिक्षित 'पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी' (PM-Kisan) योजनेचा २२ वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. या योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकार दरवर्षी पात्र शेतकऱ्यांना ६,००० रुपयांची आर्थिक मदत थेट बँक खात्यात (DBT) जमा करते. 

26
कधी जमा होणार २२ वा हप्ता?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीएम किसान योजनेचा २२ वा हप्ता २४ फेब्रुवारी २०२६ रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे. १९ नोव्हेंबर २०२५ रोजी २१ वा हप्ता वितरित झाल्यानंतर, आता शेतकरी या पुढील हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. जरी केंद्र सरकारने अद्याप अधिकृत तारीख जाहीर केली नसली, तरी प्रशासकीय स्तरावर याची तयारी अंतिम टप्प्यात असल्याचे समजते. 

36
काही शेतकऱ्यांना मिळणार ४,००० रुपये!

ज्या पात्र शेतकऱ्यांना तांत्रिक कारणांमुळे किंवा कागदपत्रांच्या त्रुटीमुळे २१ वा हप्ता मिळाला नव्हता, मात्र आता त्यांनी सर्व अटी पूर्ण केल्या आहेत, अशा शेतकऱ्यांच्या खात्यात २१ व्या आणि २२ व्या हप्त्याचे मिळून एकूण ४,००० रुपये जमा होऊ शकतात. 

46
'या' ३ गोष्टी पूर्ण नसतील तर पैसे अडकणार!

हप्ता मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी खालील कामे तातडीने पूर्ण करणे आवश्यक आहे, अन्यथा खात्यात पैसे येणार नाहीत.

e-KYC: आपल्या आधार कार्डच्या मदतीने ई-केवायसी पूर्ण करणे अनिवार्य आहे.

भू-सत्यापन (Land Verification): जमिनीची नोंदणी आणि पडताळणी प्रक्रिया पूर्ण असावी.

आधार लिंकिंग: बँक खाते आधार कार्डाशी जोडलेले असणे आणि DBT सुविधेसाठी सक्रिय असणे गरजेचे आहे. 

56
'फार्मर आयडी' (Farmer ID) महत्त्वाचा

महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश यांसारख्या राज्यांमध्ये आता 'फार्मर आयडी' अनिवार्य केला जात आहे. ज्या शेतकऱ्यांकडे हा आयडी नसेल, त्यांना आगामी हप्ता मिळवण्यात अडचणी येऊ शकतात. त्यामुळे जवळच्या सेवा केंद्रावर जाऊन आपला फार्मर आयडी तपासून घ्यावा.

66
तुमचे स्टेटस असे तपासा

तुमच्या अर्जाची स्थिती पाहण्यासाठी खालील सोप्या स्टेप्स फॉलो करा.

pmkisan.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.

'Farmer Corner' मधील 'Know Your Status' या पर्यायावर क्लिक करा.

तुमचा नोंदणी क्रमांक किंवा मोबाईल नंबर टाकून 'Get Data' वर क्लिक करा.

येथे तुम्हाला तुमच्या हप्त्याची सद्यस्थिती दिसेल.

RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Photos on

Recommended Stories