Eye Glass Care: चष्मा पुसताना या ५ चुका टाळा, नाहीतर लेन्स खराब होईल आणि नंबर वाढेल

vivek panmand   | CMS
Published : Oct 03, 2026, 03:42 PM IST
Eye Glass Care: चष्मा पुसताना या ५ चुका टाळा, नाहीतर लेन्स खराब होईल आणि नंबर वाढेल

सार

तुम्हीही शर्टाच्या कोपऱ्याने किंवा टिश्यू पेपरने चष्मा पुसता का? या चुकीमुळे लेन्सचे कोटिंग खराब होऊन चष्मा अंधुक होतो. चुकीच्या पद्धतीने चष्मा पुसल्याने डोळ्यांचा नंबरही वाढू शकतो. चष्मा पुसताना कोणत्या ५ गोष्टी वापरू नयेत आणि योग्य पद्धत कोणती, ते जाणून घ्या.

Eye Glass: चष्मा वापरणाऱ्यांना दिवसातून किमान १० वेळा तरी तो पुसावा लागतो. पण आपल्यापैकी ९०% लोक चष्मा पुसताना अशा काही गोष्टी वापरतात, ज्यामुळे लेन्सचे अक्षरशः बारा वाजतात. यामुळे लेन्सवर बारीक ओरखडे पडतात, कोटिंग निघून जाते आणि अंधुक दिसू लागल्याने डोळ्यांवर ताण पडून नंबर वाढतो.

या ५ गोष्टींनी चष्मा चुकूनही पुसू नका:

१. शर्ट, साडीचा पदर किंवा गमछा:

ही सर्वात मोठी चूक आहे. आपल्या कपड्यांवर धूळ आणि मातीचे कण असतात. सुक्या कपड्याने चष्मा पुसल्यास ही धूळ लेन्सवर घासली जाते आणि हजारो मायक्रो स्क्रॅचेस (बारीक ओरखडे) पडतात. एकदा कोटिंग खराब झाले की ते पुन्हा ठीक होत नाही.

२. टिश्यू पेपर, टॉयलेट पेपर किंवा वर्तमानपत्र:

टिश्यू पेपर मऊ असतो म्हणून तो चांगला, असा अनेकांचा समज असतो. पण सामान्य टिश्यू पेपर लाकडाच्या भुशापासून बनलेला असतो आणि त्याचे फायबर खूप खडबडीत असतात. वर्तमानपत्र तर याहूनही वाईट. यामुळे लेन्सचे अँटी-ग्लेअर आणि ब्लू-कट कोटिंग निघून जाते.

३. साबण, हँडवॉश किंवा भांडी घासायचा साबण:

चष्मा चकचकीत करण्यासाठी अनेक जण भांडी घासायचे लिक्विड किंवा जास्त केमिकल असलेला साबण वापरतात. या प्रकारच्या साबणांमध्ये अमोनिया आणि ब्लीच असते, जे लेन्सचे कोटिंग पूर्णपणे नष्ट करते.

४. तोंडाची वाफ देऊन पुसणे:

चष्मा अंधुक झाल्यावर तोंडाने 'फू' करून वाफ आणायची आणि शर्टाने पुसायचे, ही खूप सामान्य सवय आहे. पण आपल्या लाळेमध्ये ॲसिड असते, जे लेन्सचे नुकसान करते. शिवाय यामुळे लेन्सवर बॅक्टेरिया राहतात आणि डोळ्यांना इन्फेक्शन होऊ शकते.

५. अल्कोहोल, सॅनिटायझर किंवा काच पुसण्याचा स्प्रे:

चष्म्याची लेन्स आणि खिडकीची काच यात फरक आहे. काच पुसण्याच्या स्प्रेमध्ये अमोनिया असतो आणि सॅनिटायझरमध्ये ७०% अल्कोहोल असते. यामुळे पॉवर लेन्सचे कोटिंग वितळते.

मग योग्य पद्धत कोणती?

- सर्वात आधी चष्मा थंड पाण्याखाली धरा, जेणेकरून धूळ आणि माती वाहून जाईल.

- त्यानंतर माईल्ड लेन्स क्लिनरचा एक थेंब किंवा pH न्यूट्रल बेबी शॅम्पू लावून हलक्या हाताने धुवून घ्या.

- शेवटी चष्म्यासोबत मिळणाऱ्या मायक्रोफायबर कापडानेच तो पुसा. हे कापड आठवड्यातून एकदा नक्की धुवा.

- चष्मा नेहमी बॉक्समध्ये ठेवा, लेन्सची बाजू कधीही खाली करून ठेवू नका.

एका चांगल्या लेन्सची किंमत २००० ते ३००० रुपये असते. एका छोट्याशा चुकीमुळे ती खराब करण्यापेक्षा आजपासूनच योग्य नियम पाळा

PREV
Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .
Read more Articles on

Recommended Stories

EVs : 5 नवीन भन्नाट इलेक्ट्रिक गाड्या बाजारात येणार; एका चार्जमध्ये 500 किमी पेक्षा जास्त धावणार
PhonePe : अवघ्या 11 रुपयांत 25 हजार रुपयांचा हेल्थ इन्शुरन्स, फोनपेची जबरदस्त ऑफर