२ डिसेंबर रोजी मारुती सुझुकीची इलेक्ट्रिक गाडी मार्केटमध्ये दाखल, फीचर्स वाचून व्हाल थक्क

Published : Dec 01, 2025, 10:37 AM IST

मारुती सुझुकी २ डिसेंबर रोजी आपली इलेक्ट्रिक एसयूव्ही व्हिटारा बाजारात आणणार आहे. ही गाडी 49kWh आणि 61kWh बॅटरी पॅकसह उपलब्ध असेल, जी 500 किमी पेक्षा जास्त रेंज देईल. 

PREV
16
२ डिसेंबर रोजी मारुती सुझुकीची इलेक्ट्रिक गाडी मार्केटमध्ये दाखल, फीचर्स वाचून व्हाल थक्क

भारतात इलेक्ट्रिक गाडयांना मोठ्या प्रमाणावर मागणी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. अनेक ऑटो कंपन्यांनी आता गाड्या लॉंच केल्या आहेत. आता मारुती सुझुकी इलेक्ट्रिक गाड्या आणणार आहे.

26
२ डिसेंबर रोजी कोणती गाडी बाजारात येणार?

२ डिसेंबर रोजी कंपनी इलेक्ट्रिक एसयूव्ही व्हिटारा गाडी मार्केटमध्ये घेऊन येणार आहे. भारतातील ऑटो २०२५ मध्ये मध्ये पहिल्यांदा याचे अनावरण करण्यात आलं आहे. हि गाडी १०० पेक्षा जास्त देशांमध्ये निर्यात केली जाणार आहे.

36
गाडी मार्केट गाजवणार

मारुती सुझुकीची हि गाडी आता मार्केट गाजवणार आहे. 26 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील हंसलपूर प्लांटमध्ये स्थानिक हायब्रिड बॅटरी इलेक्ट्रोड उत्पादनाचे उद्घाटन केले. त्याच दिवशी ई विटाराची पहिली निर्यात बॅच देखील सुरू करण्यात आली.

46
२९०० देशांमध्ये गाड्या केल्या निर्यात

ऑगस्टमध्ये, यूके, जर्मनी, फ्रान्स, नॉर्वे आणि स्वीडनसह 12 युरोपीय देशांमध्ये 2900 हून अधिक युनिट्स पाठवण्यात आल्या. १०० पेक्षा अधिक देशांमध्ये व्हिटारा पुरवल्या जात आहेत. हि गाडी जागतिक इलेक्ट्रिक एसयूव्ही बनणार आहे.

56
बॅटरी किती राहणार?

49kWh आणि 61kWh अशा दोन बॅटरी पॅकसह मारुती ई विटारा उपलब्ध असेल. 61 किलोवॅट क्षमतेची ही टॉप-ऑफ-द-लाइन व्हेरिएंट 500 किमी पेक्षा जास्त रेंज देण्याची अपेक्षा आहे. 

66
अपेक्षित किंमत किती असणार आहे?

या गाडीची अपेक्षित किंमत हि २० ते २५ लाखांच्या दरम्यान असणार आहे. ही कार Tata Curvv EV, MG ZS EV, Mahindra BE 6, Vinfast VF6, आणि Hyundai Creta Electric शी स्पर्धा करेल.

Read more Photos on

Recommended Stories