30 किमी मायलेज, 6 एअरबॅग्ज, किंमत फक्त 6 लाख, छोट्या कुटुंबासाठी बेस्ट कार!

Published : Nov 26, 2025, 04:18 PM ISTUpdated : Nov 28, 2025, 10:33 AM IST

Maruti Baleno 2025 A Great Family Car : मारुती सुझुकी बलेनो 2025 ही एक उत्तम फॅमिली कार आहे, जिची सुरुवातीची किंमत 5.99 लाख रुपये आहे. यात प्रशस्त केबिन, उत्तम मायलेज आणि 6 एअरबॅग्जसारखी प्रगत सुरक्षा वैशिष्ट्ये आहेत. या कारबद्दल माहिती जाणून घ्या.

PREV
14
उत्तम फॅमिली कार

तुम्ही कुटुंबासाठी कमी किमतीत, प्रशस्त इंटीरियर, मोठी बूट स्पेस आणि चांगल्या मायलेजवाली कार शोधत आहात का? मग मारुती सुझुकी बलेनो 2025 एक उत्तम पर्याय आहे. पाच लोकांसाठी आरामदायक आसनव्यवस्था, प्रीमियम लूक आणि अनेक प्रगत वैशिष्ट्यांमुळे ही फॅमिली कार्समध्ये आघाडीवर आहे. सध्या उपलब्ध असलेल्या GST सवलतींमुळे ही कार कमी किमतीत मिळत आहे. त्यामुळे लोकांचा कल या कारकडे जास्त असल्याचे दिसून येते.

24
किंमत 5.99 लाखांपासून सुरू!

मारुती सुझुकी बलेनोची एक्स-शोरूम किंमत 5.99 लाख रुपयांपासून सुरू होते. GST च्या फायद्यांमुळे मॉडेलनुसार 75,100 ते 86,100 रुपयांपर्यंत किंमत कमी झाली आहे. याचा फायदा कार खरेदी करताना मिळू शकतो.

व्हेरिएंटनुसार किंमत आणि मायलेज:

1.सिग्मा MT (पेट्रोल): ₹5.99 लाख – 22.35 kmpl

2.डेल्टा MT (पेट्रोल): ₹6.8 लाख – 22.35 kmpl

3.डेल्टा AMT (पेट्रोल): ₹7.3 लाख – 22.9 kmpl

4.झेटा MT (पेट्रोल): ₹7.7 लाख – 22.35 kmpl

5.झेटा CNG MT: ₹7.7 लाख – 30.61 किमी/किलो

6.अल्फा MT/AMT – ₹8.6–9.1 लाख.

CNG व्हेरिएंट सर्व हॅचबॅकमध्ये सर्वोत्तम मायलेज देते. सीएनजीचा दर सध्या कमीही आहे.

34
रोजच्या प्रवासासाठी योग्य कार

बलेनो 2025 मध्ये 1.2-लीटर K-Series DualJet Dual VVT पेट्रोल इंजिन आहे. याची शक्ती 88 bhp आणि टॉर्क 113 Nm आहे. CNG मॉडेलमध्ये 76 bhp शक्ती मिळते. Idle Start-Stop तंत्रज्ञानामुळे इंधनाची बचत होते. 5-स्पीड मॅन्युअल आणि AMT गिअरबॉक्सचे पर्यायही उपलब्ध आहेत. शहर आणि हायवे दोन्ही ठिकाणी सुरळीत ड्रायव्हिंगचा अनुभव देणारी ही कार लहान कुटुंबांसाठी अगदी योग्य आहे.

सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे मायलेज

1.पेट्रोल MT - 22.35 kmpl

2.पेट्रोल AMT - 22.9 kmpl

3.CNG - 30.61 किमी/किलो

रोज प्रवास करणाऱ्यांसाठी CNG व्हेरिएंट खूप फायदेशीर आहे. शिवाय, 318-लीटर बूट स्पेस, 5-सीटर प्रशस्त केबिन, रिअर एसी व्हेंट्स, यूएसबी टाइप ए/सी, एलईडी डीआरएल, अलॉय व्हील्स यांसारखी वैशिष्ट्ये कारचा प्रीमियम लूक आणि आराम वाढवतात. सीएनजीमुळे प्रवासाचा खर्च खुपच कमी झाला आहे.

44
कुटुंबांसाठी परफेक्ट हॅचबॅक

बलेनो 2025 मॉडेलने सुरक्षेच्या बाबतीत कोणतीही तडजोड केलेली नाही. यात 6 एअरबॅग्ज, ESP, हिल होल्ड, ब्रेक असिस्ट, 360° कॅमेरा, ISOFIX सारखी वैशिष्ट्ये आहेत. याला भारतीय NCAP मध्ये 4-स्टार सुरक्षा रेटिंग मिळाली आहे. 9-इंचाची SmartPlay Pro+ टचस्क्रीन, HUD, वायरलेस Android Auto/CarPlay, Arkamys साउंड सिस्टीम यांसारखी वैशिष्ट्येही आहेत. कमी देखभाल खर्च, चांगली रिसेल व्हॅल्यू आणि NEXA सेवा गुणवत्तेमुळे 8 लाखांपेक्षा कमी बजेटमध्ये बलेनो लहान कुटुंबांसाठी एक उत्तम पर्याय आहे. या कारचा मेटेनन्स खुपच कमी आहे. तसेच कार बराच काळ घरी उभी राहिली तरी तिला काही प्रॉब्लेम येत नाही.

Read more Photos on

Recommended Stories