Honda Activa Becomes Indias Number 1 Scooter : भारतातील नंबर 1 स्कूटर कोणती आहे माहित आहे का? ऑक्टोबर महिन्यात 3.26 लाख युनिट्स विकून नवीन विक्रीचा विक्रम केला आहे. ही स्कूटर कोणत्या कंपनीची आहे, तिचे मायलेज, किंमत आणि फीचर्स काय आहेत ते पाहूया.
भारतात स्कूटर म्हटलं की आठवते ती होंडा ॲक्टिव्हा. कारण हे फक्त एक वाहन नाही, तर कोट्यवधी कुटुंबांचा विश्वास जिंकलेला 'घरातील सदस्य' आहे. दोन दशकांपासून बाजारात असूनही, प्रत्येक नवीन मॉडेलसाठी तोच चाहता वर्ग, तीच अपेक्षा... हेच ॲक्टिव्हाच्या यशाचे रहस्य आहे. साधा लूक आणि सोपं नियंत्रण हे तिचं बलस्थान आहे.
24
ऑक्टोबरमध्ये ॲक्टिव्हाचा विक्री विक्रम
ऑक्टोबर महिना ॲक्टिव्हासाठी सणासुदीचा ठरला. एकाच महिन्यात 3,26,551 युनिट्स विकून नवीन विक्रम केला. गेल्या वर्षी याच महिन्यात 2,66,806 युनिट्स विकले होते, म्हणजेच यावेळी विक्रीत 22.39% वाढ झाली. विक्री वाढण्यामागे दोन मुख्य कारणं आहेत. पहिलं म्हणजे GST बदलामुळे किंमत कमी झाली आणि दुसरं म्हणजे दिवाळीच्या सणात लोकांनी नवीन वाहनं खरेदी केली.
34
होंडा ॲक्टिव्हाची विक्री
होंडा ॲक्टिव्हा नेहमीच तिच्या विश्वासार्ह इंजिन, कमी देखभाल खर्च आणि चांगल्या मायलेजमुळे लोकप्रिय आहे. यावेळी कर बदल आणि सणासुदीच्या काळात विक्रीला आणखी चालना मिळाली. याच कारणामुळे ॲक्टिव्हाने 'भारतातील नंबर 1 स्कूटर' हा किताब पुन्हा एकदा सिद्ध केला आहे.
ॲक्टिव्हा 110 ची किंमत ₹83,918 – ₹96,938 (एक्स-शोरूम) आहे. 109.51cc एअर-कूल्ड सिंगल-सिलेंडर इंजिनसह, ही स्कूटर रोजच्या प्रवासासाठी योग्य आहे. मायलेज 55 kmpl पर्यंत मिळतं. ॲक्टिव्हा 125 ची किंमत ₹86,085 – ₹95,744 (एक्स-शोरूम) आहे. 123.92cc इंजिन अधिक शक्ती आणि स्मूथ रायडिंग देतं. मायलेज 47 kmpl, टॉप स्पीड 90 kmph आणि 0-60 kmph 10 सेकंदात गाठते. 5.3 लीटरच्या टाकीमुळे ही कुटुंबांसाठी एक उत्तम मॉडेल आहे.