Married Couple : पती-पत्नीने कोणत्या दिवशी संबंध ठेवू नयेत? शास्त्र काय सांगते?

Published : Jan 20, 2026, 07:56 PM IST

Married Couple : पती आणि पत्नीचं नातं हे फक्त शारीरिक नसतं, तर ते मानसिक पातळीवरचे तसेच पारंपरिक सुद्धा आहे. त्यामुळे काही विशिष्ट वेळी पती आणि पत्नीने शारीरिक संबंधांपासून दूर राहावं, असं शास्त्र सांगतं. 

PREV
16
पती-पत्नींनो, सावधान...

शास्त्रानुसार, पती-पत्नीने काही विशिष्ट वेळी शारीरिक संबंध ठेवू नयेत. असे केल्यास अनेक समस्या उद्भवू शकतात. चुकीच्या वेळी गर्भधारणा झाल्यास त्याचा परिणाम होणाऱ्या बाळावर होतो. यामुळे बाळामध्ये मानसिक किंवा शारीरिक व्यंग येऊ शकते, असे पंडित सांगतात. एवढेच नाही तर पती-पत्नीमधील वादाचे कारणही ठरू शकते. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या वेळी शारीरिक संबंध टाळावेत.

26
अमावस्या, पौर्णिमेला संबंध ठेवू नका

प्रत्येक महिन्यात येणारी अमावस्या आणि पौर्णिमा खूप खास मानली जाते. या दिवसांमध्ये वाईट शक्ती प्रभावी असतात, त्यामुळे पती-पत्नीने शारीरिक संबंधांपासून दूर राहावे, असे शास्त्र सांगते. अन्यथा वैवाहिक जीवनावर नकारात्मक परिणाम होऊन कौटुंबिक आणि संततीविषयक समस्या निर्माण होऊ शकतात.

36
चतुर्दशी आणि अष्टमीलाही संबंध टाळा

प्रत्येक महिन्याच्या चतुर्दशी आणि अष्टमी तिथीला पती-पत्नीने शारीरिक संबंध ठेवू नयेत. या दिवसांतील संबंध मुलांच्या आणि करिअरवर नकारात्मक परिणाम करतात, असे ज्योतिषी सांगतात.

46
पितृपक्षातही शारीरिक संबंध ठेवू नका

पितृपक्षात शरीर, मन आणि वाणी शुद्ध असावी. या काळात पती-पत्नीने शारीरिक संबंधांपासून दूर राहावे, असे शास्त्र सांगते. या दिवसांत संबंध ठेवल्यास पितर नाराज होतात आणि त्यांचा आशीर्वाद मिळत नाही, अशी धारणा आहे.

56
नवरात्रीच्या दिवसातही संबंध टाळा

नवरात्रीचे दिवस खूप पवित्र मानले जातात. अनेक घरांमध्ये विशेष पूजा केली जाते. त्यामुळे या काळात स्त्री-पुरुषांनी शारीरिक संबंधांपासून दूर राहावे, अन्यथा दैवी कृपा प्राप्त होत नाही, असे म्हटले जाते. 

66
उपवासाच्या दिवशी संबंध ठेवू नका

उपवास करणाऱ्या व्यक्तीने त्या दिवशी पवित्र राहून ब्रह्मचर्य पाळावे. या दिवसात पती-पत्नीने शारीरिक संबंध ठेवू नयेत. याचा मुलांच्या आरोग्यावर आणि जीवनावर वाईट परिणाम होतो. तसेच, मासिक पाळीच्या काळातही महिलांनी पतीसोबत संबंध ठेवू नयेत, हे आरोग्यासाठी चांगले नाही. 

Read more Photos on

Recommended Stories