बाळ चालायला लागल्यावर त्याच्या पायातील पैंजणांचा आवाज घरात आनंद पसरवतो. आजकाल बाजारात साधे चांदीचे पैंजण, बेल्स असलेले, बॉल डिझाइन, नावाचे आणि मल्टी-चेन पैंजण असे अनेक आकर्षक पर्याय उपलब्ध आहेत.
बाळ घरातून जाताना आवाज येईल छुमछुम, बारशाला गिफ्ट करा हे खास पैंजण
बाळ चालायला लागतं तेव्हा पायातील पैंजणांमुळे येणारा छुमछूम आवाज घरात आनंद आणतो. आजकाल लहान मुलांसाठी खूप वेगवेगळे डिज़ाईन उपलब्ध आहेत. त्याबद्दलची माहिती आपण आज जाणून घेऊयात.
26
चांदीचे साधे पैंजण
सिंपल चांदीपासून बनलेले हलके वजनाचे पैंजण बाळासाठी सगळ्यात सेफ मानले जातात. यात छोटा गोंडस घंटीचा आवाज येतो. आपलं बाळ घरात चालायला लागल्यावर त्याच्या पायातील आवाजाने सगळ्यांना खूप आनंद होईल.
36
बेल्स असलेले पैंजण
यामध्ये लहान-लहान घंट्या लावलेल्या असतात. बाळ पावलं टाकलं की छुमछूम आवाज खूप मधूर ऐकू येतो. दैनंदिन वापरासाठी हे पैंजण बेस्ट आहे. त्यामुळं बेल्स असलेल्या पैंजणाला मागणी मोठी असते.
काही पैंजणांमध्ये छोट्या सिल्वर बॉल्स लावलेले असतात. हे पैंजण हलके, स्टायलिश आणि बाळाच्या पायात खूप क्युट दिसतात. आपल्या बाळाच्या पायाचा लूक सुंदर दिसेल.
56
नेम एन्ग्रेव्हड पैंजण
आता बाळाच्या नावाचं अक्षर पैंजणावर एन्ग्रेव्ह करता येतं. गिफ्ट म्हणूनही हा एक यूनिक पर्याय आहे. त्यामुळं बारशाला जाताना आपण या गोष्टीचा नक्कीच विचार करू शकता.
66
मल्टी-चेन पैंजण
दोन ते तीन बारीक चेन एकत्र जोडून बनलेले पैंजण आजकाल ट्रेंडिंगमध्ये आहेत. यामुळे आवाज सौम्य आणि मृदू येतो. आपण पैंजण घातल्यावर पाय छुमछुम करायला लागतील.