मुंबई - आज गटारी अमावस्या आहे. पण तुम्ही ड्रींक नाही केले आणि तरी पोलिसांनी केलेली ब्रेथलाईजर टेस्ट पॉझिटिव्ह आली तर.. होय, असेच केएसआरटीसीच्या चालकांसोबत घडले. त्यांची ही टेस्ट पॉझिटिव्ह आली. जाणून घ्या नेमके काय घडले…
रस्त्यावर ट्रॅफिक पोलिस वाहन चालकांची कडक तपासणी करतात. संभाव्य अपघात टाळण्यासाठी ते ही तपासणी करत असतात. रात्रीच्या वेळी किंवा एखाद्या महत्त्वाच्या सणावारला पोलिस चालकांची ब्रेथलाईजर टेस्ट करतात. टेस्ट पॉझिटिव्ह आली तर मद्यपींना दंड ठोठावला जातो.
26
केएसआरटीसी चालकांच्या बाबतीत काय घडले...
मद्य न पिताही टेस्ट पॉझिटिव्ह आली तर? केएसआरटीसी चालकांसोबत असेच घडले. फणस खाल्ल्याने असे झाले असे सांगितले जात आहे. पोलिसांनी त्यांची टेस्ट घेतली. ती पॉझिटिव्ह आली.
36
न ड्रिंक करताही टेस्ट पॉझिटिव्ह
पंदळम डेपोच्या केएसआरटीसी चालकांना पोलिसांनी अडवले. त्यांची ब्रेथलाईजर टेस्ट केली. मद्य न पिताही ब्रेथलाईजर टेस्टमध्ये ते नापास झाले. मशीनने १० ची रीडिंग दाखवली. यावेळी पोलिसांपेक्षा या चालकांना धक्का बसला.
चालकांनी पोलिसांना सांगितले की त्यांनी मद्य प्यायले नाही, तर फणस खाल्ला होता. पोलिसांनी चालकांनी कडक तपासणी केली. तर खरंच त्यांनी मद्य घेतले नव्हते. तरीही टेस्ट पॉझिटिव्ह आली होती.
56
टेस्ट केल्यानंतर लगेच
त्यानंतर पोलिसांनी एक प्रयोग केला. एका व्यक्तीची फणस खाण्यापूर्वी टेस्ट घेतली. आणि फणस खाल्ल्यावर दुसरी टेस्ट घेतली. तर खरंच दुसरी टेस्ट पॉझिटिव्ह आली.
66
काही पदार्थ
काही पिकलेले किंवा आंबवलेले पदार्थ खाल्ल्याने, मद्य न पिताही ब्रेथलाईजर टेस्ट पॉझिटिव्ह येऊ शकते. पण याचा गैरवापरही होऊ शकतो. फणस खाल्ल्याने टेस्ट पॉझिटिव्ह आल्याचे कारण चालक देऊ शकतात.