१. टॅक्सचे गणित आधी सोडवा (Tax Planning)
प्रॉपर्टी विकल्यावर मिळणारा पैसा म्हणजे निव्वळ नफा नसतो, त्यावर सरकारला 'कॅपिटल गेन टॅक्स' द्यावा लागतो.
दोन वर्षांच्या आत विक्री: याला 'शॉर्ट टर्म कॅपिटल गेन' म्हणतात. हा नफा तुमच्या एकूण उत्पन्नात धरला जातो आणि टॅक्स स्लॅबनुसार कर लागतो.
दोन वर्षांनंतर विक्री: यावर 'लॉन्ग टर्म कॅपिटल गेन' लागतो.
टीप: आयकर कायद्याच्या कलम ५४ नुसार, घर विकून आलेले पैसे जर तुम्ही पुन्हा घर खरेदीत गुंतवले, तर तुम्हाला करात मोठी सवलत मिळू शकते.