ChatGPT Plus Free: चॅटजीपीटी प्लस आता मोफत! OpenAI देतंय १ ते ४ महिन्यांची फ्री ऑफर

vivek panmand   | CMS
Published : Oct 08, 2026, 04:26 PM IST
photos

सार

चॅटजीपीटीच्या फ्री व्हर्जनमध्ये आता खूप लिमिटेशन्स आलेत. फोटो बनवण्यापासून ते ॲडव्हान्स फीचर्ससाठी 'प्लस' सबस्क्रिप्शन लागतंच. पण तुम्हाला माहितीये का? OpenAI आता भारतीय युजर्सना १ ते ४ महिन्यांसाठी ChatGPT Plus एकदम मोफत देतंय. ही ऑफर कशी मिळवायची, याची स्टेप-बाय-स्टेप माहिती जाणून घ्या.

भारतात AI चॅटबॉट म्हटलं की सर्वात आधी नाव येतं ते ChatGPT चं. अचूक फोटो बनवणं असो किंवा कोडिंग करणं, या कामात त्याचा हात कुणीच धरू शकत नाही. पण अडचण अशी आहे की, OpenAI ने आता फ्री युजर्ससाठी खूप नियम कडक केलेत. दिवसातून फक्त काही वेळाच GPT-4o वापरता येतं, Sora ने व्हिडीओ बनवता येत नाहीत आणि लिमिट संपलं की चॅटही थांबतं. यामुळेच अनेक जण ChatGPT Plus घेण्याचा विचार करतात. भारतात याची किंमत महिन्याला १,९९९ रुपये आहे. पण आनंदाची बातमी म्हणजे, OpenAI स्वतःहून अनेक युजर्सना Plus सबस्क्रिप्शन मोफत वापरण्याची संधी देतंय.

सध्या भारतात १ महिन्याची फ्री Plus ऑफर सुरू आहे. पण ही ऑफर सर्वांसाठी नाहीये, ती फक्त काही निवडक अकाउंट्ससाठी (अकाउंट स्पेसिफिक) आहे. तुम्हाला ही ऑफर मिळालीये का, हे तपासण्यासाठी सर्वात आधी http://chatgpt.com वर जा आणि तुमच्या अकाउंटमध्ये लॉग-इन करा. त्यानंतर Settings किंवा Upgrade Plan सेक्शनमध्ये जा. जर तुम्ही या ऑफरसाठी पात्र (Eligible) असाल, तर तिथे Plus प्लॅनच्या बाजूला १,९९९ रुपये खोडून 0 रुपये किंवा 'Get 1 month free' असं लिहिलेलं दिसेल. त्यावर क्लिक करून कार्ड किंवा UPI द्वारे चेकआउट करा. पहिल्या महिन्यासाठी तुमचे कोणतेही पैसे कापले जाणार नाहीत. ज्यांनी यापूर्वी कधीही पेड प्लॅन घेतलेला नाही, त्यांच्या अकाउंटवर ही ऑफर जास्त दिसत आहे. जर तुमच्या अकाउंटवर ही ऑफर दिसत नसेल, तर दुसऱ्या Gmail आयडीने नवीन अकाउंट उघडून तुम्ही ट्राय करू शकता. पण एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, ३० दिवसांनंतर तुमच्या खात्यातून आपोआप १,९९९ रुपये कापले जातील. त्यामुळे जर तुम्हाला हे फक्त फ्रीमध्येच वापरायचं असेल, तर २५ व्या दिवशीच सबस्क्रिप्शन कॅन्सल करायला विसरू नका.

याशिवाय विद्यार्थ्यांसाठीही एक भन्नाट ऑफर आहे. जर तुम्ही अमेरिकेतील एखाद्या कॉलेज किंवा युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी असाल, तर तुम्हाला तब्बल ४ महिन्यांसाठी ChatGPT Plus एकदम मोफत मिळेल. याची किंमत जवळपास ८० डॉलर्स इतकी आहे. यासाठी तुम्हाला http://chatgpt.com/students/2026 या लिंकवर जावं लागेल. तिथे तुमचा .edu ईमेल किंवा स्टुडंट आयडी वापरून SheerID व्हेरिफिकेशन पूर्ण करा. हे केल्यावर तुमची ऑफर ॲक्टिव्हेट होईल. ही ऑफर क्लेम करण्याची शेवटची तारीख ३१ ऑक्टोबर २०২৬ आहे. या व्यतिरिक्त OpenAI ची रेफरल सिस्टीमही सुरू आहे. जर तुम्ही एखाद्या Plus युजरच्या रेफरल लिंकवरून जॉईन झालात, तर तुम्हाला ७ ते १४ दिवसांसाठी फ्री Plus सबस्क्रिप्शन मिळू शकतं. पण टेलिग्राम किंवा यूट्यूबवर विकल्या जाणाऱ्या 'Lifetime Free Plus Trick' पासून सावध राहा. हे सगळे स्कॅम असतात आणि यात तुमची वैयक्तिक माहिती चोरीला जाण्याचा मोठा धोका असतो.

PREV
Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .
Read more Articles on

Recommended Stories

Mumbai Barber : मुंबईत एका न्हाव्याची महिन्याची कमाई 1 लाख रुपये, सरकारी नोकरीलाही दिला नकार
Amazon Layoffs : ॲमेझॉनमध्ये पुन्हा नोकरकपात, 1000 कर्मचाऱ्यांना दिला नारळ