Mumbai Barber : मुंबईत एका न्हाव्याची महिन्याची कमाई 1 लाख रुपये, सरकारी नोकरीलाही दिला नकार

Published : Oct 08, 2026, 03:12 PM IST
Mumbai Barber : मुंबईत एका न्हाव्याची महिन्याची कमाई 1 लाख रुपये, सरकारी नोकरीलाही दिला नकार

सार

आर्थिक पाहणी अहवाल २०२५-२६ नुसार भारतातील गिग कामगारांची संख्या ५५ टक्क्यांनी वाढून १.२० कोटींवर पोहोचली आहे. मुंबईत 'अर्बन कंपनी'साठी काम करणारा एक न्हावी महिन्याला तब्बल १ लाख रुपये कमावतो आणि स्वातंत्र्यासाठी त्याने सरकारी नोकरीलाही नकार दिलाय.

मुंबई : आर्थिक पाहणी अहवाल २०२५-२६ नुसार देशातील गिग कामगारांच्या संख्येत ५५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष २०२१ मधील ७७ लाखांवरून ही संख्या आर्थिक वर्ष २०२५ मध्ये १.२० कोटींवर पोहोचली आहे. या वाढीमुळे पूर्वी जगण्यासाठी संघर्ष करणाऱ्या कामगारांना आता पैसे कमावण्याचे नवे मार्ग कसे खुले झाले आहेत, हे एका ताज्या सोशल मीडिया पोस्टमधून समोर आलंय. मुंबईत राहणाऱ्या हर्ष गुप्ता मधुसूदन नावाच्या एका व्यक्तीने ही पोस्ट केली आहे. त्यांनी सांगितलं की, उत्तर प्रदेशचा असलेला त्यांचा न्हावी महिन्याला तब्बल १ लाख रुपये कमावतो.

मधुसूदन यांनी 'अर्बन कंपनी'च्या माध्यमातून या न्हाव्याला घरी बोलावलं होतं. तो न्हावी मूळचा आझमगडचा असून आठवड्यातले सहा दिवस तो काम करतो. मधुसूदन यांनी त्यांच्या एक्स (पूर्वीचे ट्विटर) पोस्टमध्ये लिहिलंय, "तो आठवड्यातले सहा दिवस सकाळपासून रात्रीपर्यंत काम करतो आणि प्रवासाचा खर्च वजा जाता महिन्याला साधारण एक लाख रुपये कमावतो."

सध्याच्या कामाऐवजी कधी सरकारी नोकरी करणार का, असा प्रश्न मधुसूदन यांनी त्याला विचारला. त्यावर त्या न्हाव्याने थेट नकार दिला. या कामात मिळणाऱ्या स्वातंत्र्यामुळे आपण हेच काम पसंत करत असल्याचं त्याने सांगितलं.

"संधी किंवा नोकऱ्यांची कोणतीही कमतरता नाही, फक्त मेहनत करण्याची तयारी हवी. मला माझं काम आणि स्वातंत्र्य आवडतं, त्यामुळे कोणी ऑफर दिली तरी मी सुरुवातीच्या लेव्हलची सरकारी नोकरी करणार नाही," असं तो न्हावी म्हणाला.

त्यानंतर मधुसूदन यांनी त्याला त्याच्या घरच्या परिस्थितीबद्दल विचारलं. न्हाव्याने सांगितलं की, पूर्वी त्याच्या गावातून लखनौला जायला सात ते आठ तास लागायचे. पण आता रस्ते इतके चांगले झालेत की, चहा आणि जेवणासाठी थांबूनही तेवढ्याच वेळात तो जाऊन-येऊन करू शकतो.

"देशात सुरू असलेल्या विकासकामांवर तो खूप खूश होता. गावात त्याच्या कुटुंबाला काही सरकारी योजनांचा लाभ मिळाला, पण शहरात नाही, असं त्याने सांगितलं. त्याचा टीडीएस (TDS) कापला जातो, त्यामुळे तो अभिमानाने आपला इन्कम टॅक्स रिटर्न भरतो आणि अनेकदा त्याला रिफंडही मिळतो," असं मधुसूदन यांनी पोस्टमध्ये म्हटलंय.

"त्याला एक मुलगा आहे, ज्याला तो एका खाजगी प्री-स्कूलमध्ये पाठवतो. त्याची पत्नीही आधी काम करून थोडे जास्तीचे पैसे कमवायची, पण मूल लहान असल्याने तिने सध्या कामातून ब्रेक घेतला आहे."

सोशल मीडियावरील प्रतिक्रिया

ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडिया युजर्सनी यावर भरभरून प्रतिक्रिया दिल्या. आजच्या भारतीय अर्थव्यवस्थेत गिग वर्कला फारसं महत्त्व दिलं जात नाही, पण मधुसूदन यांच्या न्हाव्याप्रमाणेच हे काम अनेक लोकांना आर्थिकदृष्ट्या मोठी मदत करतं, याकडे अनेकांनी लक्ष वेधलं.

एका युजरने लिहिलं की, भारताच्या डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरमुळे गिग क्षेत्रात ज्या नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत, त्याचं महत्त्व नक्कीच कमी लेखलं जातंय.

दुसऱ्या एका युजरने कमेंट केली, "कालच मी माझा एसी (AC) इन्स्टॉल करून घेतला. तो माणूस रोज किमान चार ते पाच एसी बसवतो आणि एका सर्व्हिससाठी २००० रुपये घेतो. आता तुम्हीच हिशोब करा."

तिसऱ्या एका व्यक्तीने निरीक्षण नोंदवलं की, "एक देश म्हणून आपल्या काही समस्या नक्कीच आहेत, पण जेव्हा लोकांची काम करण्याची तयारी असते, तेव्हा काम त्यांना शोधत येतंच. विकास हा टप्प्याटप्प्याने होतो, एका रात्रीत नाही, हे समजून घेणं गरजेचं आहे."

PREV
Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .
Read more Articles on

Recommended Stories

Amazon Layoffs : ॲमेझॉनमध्ये पुन्हा नोकरकपात, 1000 कर्मचाऱ्यांना दिला नारळ
Emirates Draw : अकाऊंटंची नोकरी करणाऱ्याने जिंकले तब्बल 4 दशलक्ष डॉलर्स, वाचा त्याची रंजक गोष्ट