Google Maps लवकरच लाँच होणार धमाकेदार फीचर, इंटरनेटशिवायही शेअर करता येणार लोकेशन

Published : Apr 21, 2024, 07:00 AM IST
google maps

सार

Google Maps New Feature : गुगलकडून आपल्या युजर्ससाठी वेळोवेळी नवे अपडेट्स आणि फीचर्स रोलआउट केले जातात. अशातच आता कंपनी गुगल मॅपच्या माध्यमातून आपले लोकेशन इतरांना इंटरेनटशिवाय शेअर करण्याची परवानगी देणार आहे.  

Tech News : जगभरातील दिग्गज कंपन्या सातत्याने आपले अ‍ॅप किंवा सर्विसेसाठी अपडेट्स आणत असतात. आता गुगल अ‍ॅपमध्ये आणखी एक शानदार फीचर आले आहे. या फीचरमुळे सॅटेलाइट कनेक्टिव्हिटी सुधारली जाणार आहे. रिपोर्ट्सनुसार, डिवाइसमध्ये सेल्युलर नेटवर्क आणि वायफाय नसल्यास गुगल मॅपच्या सॅटेलाइट कनेक्टिव्हिटी फीचरची मदत घेतील जाणार आहे.

गुगल मॅप्स सॅटेलाइट कनेक्टिव्हिटी फीचर
गुगल मॅप्स सॅटेलाइट कनेक्टिव्हिटी फीचर सध्या बीटा वर्जन लाँच केले आहे. या अपडेटची खास गोष्ट अशी की, युजर्सला गुगल मॅप्समध्येच आपले लोकेशन शेअर करता येणार आहे. ज्या ठिकाणी इंटनेट किंवा नेटवर्कची समस्या असते तेथे गुगल मॅप्स सॅटेलाइट कनेक्टिव्हिटी फीचर कामी येणार आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, युजर्सला लवकरच नव्या फीचरसंदर्भातील अपडेटचा वापर करता येणार आहे. युजर्सला 15 मिनिटानंतर गुगल मॅप्सवर लोकेशन शेअर करता येणार आहे. या फीचरचा फायदा दिवसातून केवळ पाच वेळाच घेता येणार आहे.

कधी लाँच होणार फीचर?
गुगलने अद्याप गुगल मॅप्स सॅटेलाइट कनेक्टिव्हिटी फीचर कधी लाँच केले जाणार याची तारीख जाहीर केलेली नाही. पण फीचरचा वापर आपत्कालीन स्थितीत करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.

आणखी वाचा : 

पहिल्यांदाच विमानाने प्रवास करणार आहात? या गोष्टींची घ्या काळजी

जगातील या देशात होतात सतत भुकंप, जाणून घ्या...

PREV

Recommended Stories

नाताळात कन्फर्म तिकीट हवंय? कोकण रेल्वेची खास भेट!, 'या' विशेष गाड्यांचं संपूर्ण वेळापत्रक पाहा!
भारतातील 5 टॅंकसारख्या मजबूत कार, NCAP मध्ये मिळाले 5 स्टार रेटींग!