
Elon Musk India Visit : टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क भारतात येणार नाहीयेत. खरंतर, एलॉन मस्क यांचा भारत दौरा पुढे ढकलला आहे. दरम्यान, भारतातील दौरा पुढे ढकलण्यामागील ठोस कारण समोर आलेले नाही. पण असे मानले जातेय की, मस्क यांची 23 एप्रिलला अमेरिकेत एक पत्रकार परिषद असल्याने पुढे ढकलण्यात आला आहे.
एलॉन मस्क यांनी काय म्हटले?
एलॉन मस्क यांनी सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म ‘X’ वर म्हटले की, “दुर्दैवाने टेस्लाच्या फार मोठ्या जबाबदाऱ्यांमुळे भारतात येण्यास वेळ होणार आहे. पण यंदाच्या वर्षाच्या अखेरीस भारतात येण्यास उत्सुक आहे.”
पंतप्रधान नरेंद्र मोदींची घेणार होते भेट
रिपोर्ट्सनुसार, एलॉन मस्क भारतात आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची भेट गेणार होते. याशिवाय भारतात टेस्लाच्या (Tesla) एण्ट्रीबद्दलही चर्चा केली जाणार होती. याआधी 10 एप्रिलला एलॉन मस्क यांनी स्वत: सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म 'X' वर माहिती देत म्हटले होते की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्यासाठी उत्सुक आहे.
टेस्लाची भारतात होणार होती गुंतवणूक
भारतात टेस्लाचे प्लांट उभारले जाणार असल्याची चर्चा होती. एलॉन मस्क भारतात मोठी गुंतवणूक करण्याची देखील शक्यता होती. रिपोर्ट्सनुसार, मस्क भारतात एक फॅक्ट्री तयार करण्यासाठी दोन ते तीन अरब डॉलर्सच्या गुंतवणूकीची घोषणा करण्याची शक्यता होती. कारण सरकारने आयात टॅक्सवर उच्च शुल्क कमी करण्यासाठी नव्या पॉलिसीची घोषणा केली होती. पण अट अशी होती की, कंपनीने स्थानिक स्तरावर गुंतणूक केली तरच याचा लाभ मिळेल.
आणखी वाचा :
इलॉन मस्क यांनी इराण आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या तणावाबाबत केले ट्विट, पाहून तुम्ही म्हणाल...
नेस्ले कंपनीच्या प्रोडक्टमध्ये साखरेचं प्रमाण जास्त, फूड फार्मरने केले 'हे' गंभीर आरोप