Gold Rate Today : सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण, गुंतवणूकदारांसाठी संधी की सावधगिरी बाळगावी?

Published : Jul 26, 2025, 10:35 AM ISTUpdated : Jul 26, 2025, 10:37 AM IST

मुंबई - गेल्या काही दिवसांपासून वाढलेले सोनं आणि चांदीचे दर आता घसरत आहेत. एकीकडे 24 कॅरेट सोन्याच्या दरात मोठी घसरण झालेली असताना, चांदीचे दर देखील कमी झाले. गुंतवणूकदारांसाठी ही एक संधी असू शकते, पण बाजारातील अस्थिरतेमुळे सावधगिरीही बाळगावी लागेल.

PREV
15
सोनं आणि चांदी दोन्ही स्वस्त

जीएसटीसह 24 कॅरेट सोन्याचा एक तोळ्याचा दर 1,01,697 रुपये इतका होता. यामध्ये एका दिवसात 145 रुपयांची घट झाली आहे. चांदीच्या दरातही आज 104 रुपयांची घसरण झाली असून प्रति किलो चांदीचा दर 1,18,437 रुपये झाला आहे.

तिन्ही दिवसांमध्ये घटलेल्या दरांची माहिती

गेल्या तीन दिवसांमध्ये सोन्याच्या दरात एकूण 1,798 रुपयांची घसरण झाली आहे. 24 कॅरेट सोनं 1,00,533 रुपयांवरून 98,735 रुपयांवर पोहोचले आहे. याच कालावधीत चांदीचे दर 862 रुपयांनी घटले आहेत. 23 जुलै 2025 रोजी चांदीचा दर 1,15,850 रुपये होता, जो आता घटून 1,14,988 रुपये झाला आहे.

25
जुलै महिन्यात सोनं-चांदीने गाठले उच्चांक

जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून सोनं आणि चांदीच्या दरात प्रचंड वाढ झाली होती. सोन्याचा दर तब्बल 2,849 रुपयांनी वाढला तर चांदीचा दर 9,582 रुपयांनी वाढला. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या (IBJA) आकडेवारीनुसार, 30 जून 2025 रोजी सोन्याचा दर 95,886 रुपये होता तर चांदीचा दर 1,05,510 रुपये प्रति किलो इतका होता. त्यानंतर जुलैमध्ये दोन्ही धातूंनी तेजी गाठली.

2025 मध्ये आत्तापर्यंतची वाढ

चालू वर्षात म्हणजेच 2025 मध्ये सोन्याच्या दरात तब्बल 22,995 रुपयांची वाढ झाली आहे. 31 डिसेंबर 2024 रोजी सोन्याचा दर 76,045 रुपये होता, जो आता 98,735 रुपये इतका झाला आहे. चांदीचाही दर 28,971 रुपयांनी वाढून 85,680 रुपयांवरून 1,14,651 रुपयांवर पोहोचला आहे. त्यामुळे दीर्घकालीन गुंतवणुकीच्या दृष्टीने सोनं-चांदीने चांगला परतावा दिला आहे.

35
दर जाहीर करण्याची प्रक्रिया आणि जीएसटीचा फरक

सोनं आणि चांदीचे दर India Bullion and Jewellers Association (IBJA) कडून दररोज दोन वेळा जाहीर केले जातात. या दरांमध्ये जीएसटीचा समावेश नसतो. त्यामुळे बाजारात खरेदी करताना जीएसटी जोडल्यावर दर 1,000 ते 2,000 रुपयांनी वाढलेले असतात. हा फरक गुंतवणूक करताना लक्षात घेणे आवश्यक आहे.

घसरणीमागील संभाव्य कारणं

गेल्या काही दिवसांत सोनं-चांदीच्या दरात आलेली घसरण अनेक आंतरराष्ट्रीय घडामोडींशी संबंधित आहे. अमेरिकेने जपानसारख्या प्रमुख व्यापारी देशांसोबत केलेल्या व्यापार करारामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याचे आकर्षण कमी झाले आहे. तसेच, भारतातील किरकोळ गुंतवणूकदारांनीही विक्रमी दर पाहून मागे हटण्याचा कल दाखवला आहे. त्यामुळे मागणीत घट झाल्याने दर घसरले आहेत.

45
आयातीत घट आणि देशांतर्गत विक्रीचा परिणाम

जून 2025 मध्ये भारताने सोन्याची आयात 40% ने कमी केली आहे. जूनमध्ये देशात केवळ 21 टन सोनं आयात झालं, जे मागील दोन वर्षांतील सर्वात कमी प्रमाण आहे. याशिवाय, देशांतर्गत विक्रीही काही प्रमाणात कमी झाल्याने डीलर्सना दरात सवलती द्याव्या लागल्या आहेत. पूर्वी 8 डॉलर प्रति औंस सवलत दिली जात होती, ती आता 10 डॉलरपर्यंत वाढवण्यात आली आहे.

तज्ज्ञांचे विश्लेषण

गुडरिटर्न्सच्या अहवालानुसार, केडिया अ‍ॅडव्हायझरीजचे संचालक अजय केडिया यांनी सांगितले की, “बाजाराचे लक्ष अमेरिकेतील फेडरल रिझर्व्हच्या पुढील बैठकीकडे आहे. त्यात व्याजदरात बदल होण्याची शक्यता कमी आहे, परंतु ऑक्टोबरमध्ये दरकपात होण्याच्या शक्यता असल्याने बाजार अस्थिर राहू शकतो.”

ते पुढे म्हणतात की, “देशांतर्गत मागणीत कमकुवतपणा आणि जागतिक आर्थिक अनिश्चिततेमुळे दर कमी होण्याची शक्यता आहे. मात्र, हीच वेळ सोनं खरेदी करण्याची चांगली संधी असू शकते.”

55
गुंतवणूकदारांनी काय करावं?

सध्याच्या घसरणीचा फायदा घेऊन सोनं आणि चांदीमध्ये गुंतवणूक करण्याची ही योग्य वेळ आहे, असं अनेक तज्ज्ञांचं मत आहे. मात्र, हे लक्षात ठेवावं की, सोनं ही दीर्घकालीन गुंतवणूक आहे. त्यामुळे कोणतीही गुंतवणूक करताना बाजाराचा अभ्यास करूनच निर्णय घेणं आवश्यक आहे. अल्पकालीन घसरणीने गोंधळून न जाता, दीर्घकालीन उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवणं फायदेशीर ठरेल.

Read more Photos on

Recommended Stories