गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी रेल्वेकडून विशेष गाड्या, पाहा वेळापत्रक
Special Train For Ganeshotsav : गणेशोत्सवासाठी बहुतांशजण मुंबईहून कोकणात जातात. यासाठी रेल्वे तिकिटांचे बुकिंग चार ते पाच महिने आधी केले जाते. याशिवाय भारतीय रेल्वेकडून गणेशोत्सवासाठी विशेष गाड्या सोडल्या जातात.
Konkan Special Train For Ganeshotsav : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी प्रत्येक वर्षी विशेष गाड्या सोडल्या जातात. खरंतर, कोकणात गणेशोत्सवसाची मोठी धूम पहायला मिळते. यामुळेच नागरिक तीन ते चार महिने अगोदर गाड्यांचे तिकीट काढून ठेवतात. अशातच आता यंदाच्या गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यासाठी काही विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. याचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे.
मुंबई ते कोकणदरम्यान 202 विशेष रेल्वे गाड्या मुंबई ते कोकणदरम्यान 202 विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या गाड्यांसाठीच्या आरक्षणाची सुरुवात 21 जुलैपासून झाली आहे. यामुळे नागरिकांना आता तिकीटाचे आरक्षण करुन प्रवास करणे सुखकर होणार आहे. याशिवाय सध्या रेल्वे वेटिंग तिकीटाच्या माध्यमातून प्रवास करता येणार नसल्याच्या निर्णयामुळेही कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना गणोशोत्सवावेळी गाड्यांना होणाऱ्या गर्दीचा त्रास सहन करावा लागणार नाहीये. कोकणात जाणाऱ्या गाड्या 1 सप्टेंबर ते 18 सप्टेंबरदरम्यान चालवल्या जाणार आहेत.
कोकणात जाणाऱ्या विशेष गाड्यांचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे- ट्रेन क्रमांक 0151 मुंबई-सीएसएमटी ते सावंतवाडी ट्रेन दररोज चालवली जाणार आहे. मुंबई सीएसएमटी येथून रात्री 12 वाजून 20 मिनिटांनी ट्रेन सुटणार असून सावंतवाडी स्थानकात दुसऱ्या दिवशी दुपारी 2 वाजून 20 मिनिटांनी पोहोचणार आहे.
ट्रेन क्रमांक 01153 मुंबई सीएसएमटी ते रत्नागिरी गाडी दररोज धावणार आहे. मुंबई सीएसएमटी येथून रात्री 11 वाजून 30 मिनिटांनी गाडी सुटणार असून दुसऱ्या दिवशी रत्नागिरीला सकाळी 8 वाजून 10 मिनिटांनी पोहोचणार आहे.
01167 लोकमान्य टिळक टर्मिनस ते कुडाळ दरम्यान दररोज गाडी चालवली जाणार आहे. या गाडीचे वेळापत्रक लोकमान्य टिळक टर्मिनस येथून रात्री 9 वाजता सुटणार असून कुडाळ स्थानकात दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी पोहोचणार आहे.
01171 लोकमान्य टिळक टर्मिनस ते सावंतवाडी रोड दररोज विशेष गाडी धावणार असून एलटीटी येथून रात्री 8 वाजून 20 मिनिटांनी सुटणार असून दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता सावंतवाडी येथे पोहोचणार आहे.
01155 दिवा जंक्शन-चिपळूण गाडी दरररोज चालवली जाणार असून दिवा येथून सकाळी 7 वाजून 15 मिनिटांनी सुटणार आहे. दुसऱ्या दिवसी चिपळूणला दुपारी 2 वाजता पोहोचणार आहे.
01185 गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस ते कुडाळ दरम्यान सोमवार, बुधवार आणि शनिवारी चालवली जाणार आहे. गाडी एलटीटी येथून रात्री 12 वाजून 45 मिनिटांनी सुटणार असून कुडाळ स्थानकात दुसऱ्या दिवशी दुपारी 12 वाजून 30 मिनिटांनी पोहोचणार आहे.
01165 लोकमान्य टिळक टर्मिनस ते कुडाळदरम्यानची गाडी केवळ मंगळवारी चालवली जाणार आहे. एलटीटी येथून गाडी रात्री 12 वाजून 45 मिनिटांनी सुटणार असून कुडाळ स्थानकात दुसऱ्या दिवशी दुपारी 12 वाजून 30 मिनिटांनी पोहोचणार आहे.
01152 सावंतवाडी रोड ते मुंबई सीएसएमटी स्थानकादरम्यान दररोज विशेष गाडी सोडली जाणार आहे. गाडी दुपारी 3 वाजून 10 मिनिटांनी सावंतवाडी येथून सुटणार असून मुंबई सीएसएमटी स्थानकात 3 वाजून 45 मिनिटांनी पोहचणार आहे.
01154 रत्नागिरी ते मुंबईसाठी दररोज गाडी सोडली जाणार आहे. रत्नागिरी येथून गाडी पहाटे 4 वाजता सुटणार असून रात्री 1 वाजून 30 मिनिटांनी मुंबई सीएसएमटी येथे पोहोचणार आहे.
01168 कुडाळ-लोकमान्य टिळक टर्मिनस गाडी दररोज धावणार आहे. कुडाळ येथून गाडी दुपारी 12 वाजून 30 मिनिटांनी सुटणार असून लोकमान्य टिळक टर्मिनस येथे 12 वाजून 40 मिनिटांनी पोहोचणार आहे.
01172 सावंतवाडी रोड ते लोकमान्य टिळक टर्मिनस गाडी दररोज दुपारी 10 वाजून 20 मिनिटांनी सुटणार असून एलटीटी येथे 10 वाजून 40 मिनिटांनी पोहोचणार आहे.
01156 चिपळूण-दिवा जंक्शन दररोज दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी सुटणार असून दिवा येथे रात्री 10 वाजून 50 मिनिटांनी पोहोचणार आहे.
01186 कुडाळ ते लोकमान्य टिळक टर्मिनस गाडी सोमवार, बुधवार आणि शनिवारी चालवली जाणार आहे. कुडाळ येथून गाडी दुपारी 4 वाजून 30 मिनिटांनी सुटणार असून एलटीटी येथे पहाटे 4 वाजून 50 मिनिटांनी पोहोचणार आहे.
01166 कुडाळ ते लोकमान्य टिळक टर्मिनससाठीची गाडी मंगळवारी दुपारी 4 वाजून 30 मिनिटांनी सुटणार असून एलटीटी येथे पहाटे 4 वाजून 50 मिनिटांनी पोहोचणार आहे.