Tweet करण्यासाठी युजर्सला पैसे मोजावे लागणार, एलॉन मस्क यांनी सांगितले हे कारण

Technology : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर ट्विट करण्यासाठी आता पैसे मोजावे लागणार आहेत. याबद्दलचे स्पष्टीकरण एलॉन मस्क यांनी एक पोस्ट शेअर करत दिले आहे.

Chanda Mandavkar | Published : Apr 16, 2024 7:12 AM IST / Updated: Apr 16 2024, 12:44 PM IST

Tech News : सातत्याने चर्चेत राहणाऱ्या एलॉन मस्क (Elon Musk) यांनी मालकी हक्क असलेल्या सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म ‘X’ संदर्भात एका मोठ्या बदलावाची घोषणा केली आहे. मस्क यांनी म्हटले की, कंपनी एक्स प्लॅटफॉर्मचा वापर करण्यासाठी युजर्सला पैसे मोजावे लागणार आहेत.

खरंतर, बॉट समस्येवर तोडगा काढण्यासाठी हे पाऊल महत्त्वाचे असू शकते. मायक्रोब्लॉगिंग वेबसाइटवर केल्या जाणाऱ्या बदलावांबद्दल पोस्टखाली एका युजर्सने कॉमेंट केली होती. यालाच उत्तर देत एलॉन मस्क यांनी म्हटले की, नव्या युजर्सला लहान शुल्क द्यावा लागणार आहे. जेणेकरून बॉट्सच्या हल्ल्यावर नियंत्रण मिळवण्याचा एकमात्र पर्याय होता.

Like, Post करण्यासाठी द्यावे लागणार पैसे
एलॉन मस्क यांनी ट्विट करत म्हटले की, नव्या एक्स प्लॅटफॉर्मवरील युजर्सला पैसे द्यावे लागणार आहेत. याशिवाय नव्या युजरने पोस्ट केल्यास, पोस्ट लाइक किंवा ट्विटला रिप्लाय केल्यास अथवा बुकमार्किंग केल्यास एक्स प्लॅटफॉर्मला पैसे द्यावे लागणार आहेत. एलॉन मस्क यांच्या निर्णयावर युजर्सने नाराजी व्यक्त केली आहे.

एक्स डेली न्यूजच्या माध्यमातून समोर आली माहिती
एक्स प्लॅटफॉर्मवर बदल करण्यासंदर्भातील माहिती सर्वप्रथम एक्स डेली न्यूजवर समोर आली आहे. यामध्ये सांगण्यात आले आहे की, एक्स प्लॅटफॉर्मवर नव्याने येणाऱ्या युजर्सला ट्विट करण्यासाठी वार्षिक शुल्क मोजावा लागणार आहे.

न्यूझीलंड आणि फिलीपिन्समध्ये झाले ट्रायल
नव्या युजर्सला ट्विट करण्यासाठी वार्षिक शुल्काचे ट्रायल न्यूझीलंड आणि फिलीपिन्समध्ये यशस्वी झाले. युजर्सने या निर्णयाचे कौतुक करत ट्विट करण्यासाठी ठरवण्यात आलेले शुल्कही भरत ट्विट केले.

तीन महिन्यानंतर ट्विटसाठी पैसे नाही
एलॉन मस्क यांनी म्हटले की, वार्षिक शुल्क भरल्याच्या तीन महिन्यानंतर फुकटात ट्विट करता येणार आहे. याशिवाय ट्विटर पेमेंटच्या शुल्कामुळे एक्स प्लॅटफॉर्मवरील फेक अकाउंटचा धोकाही कमी होऊ शकतो.

आणखी वाचा : 

नीता अंबानींची कोट्यावधींची पर्सनलाइज्ड Rolls Royce कार पाहिलीत का?

पहिल्यांदाच विमानाने प्रवास करणार आहात? या गोष्टींची घ्या काळजी

Share this article