जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींपैकी एक असणाऱ्या मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानींची नेहमीच चर्चा होत असते. नीता अंबानींची कधी साडी तर कधी दागिन्यांवरुन चर्चा केली जाते.
Image credits: others
Marathi
नीता अंबानींकडील कार कलेक्शन
अंबानी कुटुंबियांकडे एकापेक्षा एक उत्तम आणि आलिशान कारचे कलेक्शन आहे. यांच्याकडे 150 कार असून त्यापैकी काही कार नीता अंबानी यांच्या आहेत.
Image credits: Instagram
Marathi
नीता अंबानींनी खरेदी केली नवी कार
नीता अंबानी यांनी नुकतीच एक नवी कार खरेदी केलीय. नीता अंबानी यांनी रोल्स रॉयल फॅन्टम VIII खरेदी केली असून ती कस्टमाइज करण्यात आली आहे.
Image credits: Instagram
Marathi
रोल्स रॉयल फॅटम VIII कारची खासियत
नीता अंबानींच्या रोल्स रॉयल फॅन्टम VIII कारची खासियत अशी की, ती एक्सटेंडेड व्हिल वर्जन आहे. याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
Image credits: Instagram
Marathi
कारची सीटही कस्टमाइज केलीय
नीता अंबानींनी नव्या कारची सीटही कस्टमाइज केली आहे. यावर NMA असे लिहिले असून त्याचा अर्थ नीता मुकेश अंबानी असा लावला जातोय.
Image credits: Instagram
Marathi
कारचा हटके रंग
रोल्स रॉयल फॅन्टम VIII कार काही रंगांमध्ये येते. पण नीता अंबानीनी खरेदी केलेल्या कारचा रंग हटके आणि वेगळा आहे. रोझ पिंक रंगातील कारने आता सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
Image credits: Instagram
Marathi
सोन्याचा लोगो
कारला पुढच्या बाजूल रोल्स रॉयसचा सोन्याचा लोगो लावलेला जातो. त्याला 'स्पिरिट ऑफ एक्सटेसी' असे म्हटले जाते.
Image credits: Instagram
Marathi
कारची किंमत
भारतीय बाजारात रोल्स रॉयल फॅन्टम VIII EWB ची किंमत 12 कोटी रुपये आहे. पण नीता अंबानींच्या कस्टमाइज कारची किंमत काय आहे याची ठोस माहिती नाही.