Mercenary Spyware हल्लामुळे भारतासह जगातील 91 देशाच्या Apple युजर्सला धोका, कंपनीने दिलाय हा इशारा

टेक दिग्गज कंपनी अ‍ॅप्पलने भारतासह जगभरातील 1 देशातील युजर्सला Mercenary Spyware चा धोका असल्याचे म्हटले आहे. याच्या माध्यमातून काही निवडक युजर्सला इमेल पाठवून टार्गेट केले जात आहे.

Apple Alert : अ‍ॅप्पल कंपनीने भारतासह जगभरातील 91 देशातील युजर्सला स्पायवेअर हल्ल्यासंदर्भात एक सतर्कतेचा इशारा दिला आहे. अ‍ॅप्पलने म्हटले आहे की, Mercenary Spyware Attack चे तुम्ही शिकार होऊ शकता. खरंतर, याचा युजर्सच्या प्रायव्हेसीला धोका निर्माण होऊ शकतो. या स्पायवेअरचा वापर करून काही निवडक युजर्सला टार्गेट केले जात आहे. कंपनीने इमेलच्या माध्यमातून मर्सनरी स्पायवेअरसंदर्भात माहिती दिली आहे.

मर्सनरी स्पायवेअर नक्की काय आहे?

अ‍ॅप्पलकडून सातत्याने सतर्कतेचा इशारा
अ‍ॅप्पलकडून वर्ष 2021 पासून ते आतापर्यंत काही वेळेस अशा प्रकारच्या हल्ल्याबद्दल युजर्सला सातत्याने सतर्कतेचा इशारा दिला आहे. अ‍ॅप्पलने आतापर्यंत 150 हून अधिक देशातील युदर्जसला मालवेअर हल्ल्याबद्दल आधीच इशारा दिला होता.

ऑक्टोंबर 2023 मध्ये भारतातील काही खासदारांनी सोशल मीडियावर अ‍ॅप्पलने जारी केलेल्या इमेलचे काही स्क्रिनशॉट्स शेअर केले होते. यामध्ये म्हटले होते की, अ‍ॅप्पलचे असे मानणे आहे तुम्हाला स्टेट स्पॉन्सर (सरकार) हल्ल्याद्वारे टार्गेट केले जात आहे. जो तुमच्या अ‍ॅप्पल आयडीसंबंधित (Apple ID) आयफोनला रिमोटली कॉम्प्रोमाइज करण्याचा प्रयत्न करत आहे. या प्रकरणात ज्यावेळी सरकारने कंपनीकडे उत्तर मागितले असता त्यांना इमेलमध्ये ज्या हल्ल्याचा धोका सांगण्यात आला होता त्यासाठी कोणत्याही स्पेसिफिक स्टेट स्पॉन्सर अटॅकर्स (Specific State Sponsored Attackers) जबाबदार नाही असे म्हटले होते.

आणखी वाचा : 

पहिल्यांदाच विमानाने प्रवास करणार आहात? या गोष्टींची घ्या काळजी

तुमची मुलं सातत्याने मोबाइलचा वापर करतात? होऊ शकतो हा आजार

व्हॉट्सॲप ॲडमिनला निवडणुकीत घ्यावी लागेल 'ही' खबरदारी

Share this article