CTET 2026 Exam Date Announced: CBSE ने जाहीर केली CTET 2026 ची तारीख; परीक्षा कधी, अर्ज कसा करावा जाणून घ्या सर्व तपशील

Published : Oct 25, 2025, 07:42 PM IST

CTET 2026 Exam Date Announced: CBSE बोर्डाने केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) 2026 ची तारीख जाहीर केली आहे. ही परीक्षा 8 फेब्रुवारी 2026 रोजी देशभरातील 132 शहरांमध्ये 20 भाषांमध्ये घेतली जाईल. 

PREV
15
CBSE ने जाहीर केली CTET 2026 ची तारीख; परीक्षा कधी?

CTET 2026 Exam Date Announced: CBSE बोर्डने केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) 2026 साठी तारीख जाहीर केली आहे. ही महत्त्वाची परीक्षा 8 फेब्रुवारी 2026 रोजी देशभरातील 132 शहरांमध्ये 20 भाषांमध्ये घेण्यात येणार आहे.

टीईटी परीक्षा ही शिक्षकांच्या पात्रतेसाठी अनिवार्य आहे. राज्य व केंद्र शाळांमध्ये शिक्षक होण्यासाठी उमेदवारांनी ही परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक आहे. परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना CBSE बोर्डाच्या शाळांमध्ये शिक्षक म्हणून काम करण्याची संधी मिळेल.

25
CTET 2026 नोंदणी कशी करावी?

इच्छुक उमेदवार CTET अधिकृत वेबसाइट (ctet.nic.in) वर जाऊन अर्ज करू शकतात. अर्ज भरताना खालील बाबी लक्षात घ्या.

‘Apply for CTET 2026’ लिंकवर क्लिक करा.

सर्व वैयक्तिक आणि शैक्षणिक तपशील अचूक भरा.

परीक्षा केंद्र, पेपर (I किंवा II किंवा दोन्ही), आणि प्राधान्य भाषा निवडा.

पासपोर्ट आकाराचा फोटो आणि सही आवश्यक फॉरमॅटमध्ये अपलोड करा.

अर्ज पूर्ण केल्यानंतर शुल्क भरा. 

35
अर्ज शुल्क

खुल्या प्रवर्ग/ओबीसी: एका पेपरसाठी ₹1000, दोन्ही पेपरसाठी ₹1200

SC/ST/PWD: एका पेपरसाठी ₹500, दोन्ही पेपरसाठी ₹600

नोट: शुल्क न भरल्यास उमेदवारी कन्फर्म होणार नाही आणि हॉल टिकटही मिळणार नाही.

45
परीक्षा स्वरूप

पेपर I: इयत्ता 1ली ते 5वी शिकवण्यासाठी शिक्षकांसाठी

पेपर II: इयत्ता 6वी ते 8वी शिकवण्यासाठी शिक्षकांसाठी

प्रश्न: 150 बहुपर्यायी (MCQs)

नकारात्मक गुणांकन: नाही

नकारात्मक गुणांकन नसल्यामुळे उमेदवारांसाठी ही परीक्षा फायदेशीर आहे.

55
महत्त्वाचे मुद्दे

परीक्षा देशभरातील 132 शहरांमध्ये घेण्यात येणार आहे.

पेपर I व II प्रमाणे शिक्षकांची पात्रता तपासली जाईल.

अर्ज प्रक्रिया आणि फीसची माहिती CTET अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे.

CTET 2026 ही शिक्षक बनण्याची महत्त्वाची संधी आहे. परीक्षा तारखा आणि अर्ज प्रक्रियेत वेळेत सहभागी होणे अत्यंत आवश्यक आहे.

RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Photos on

Recommended Stories