Published : Oct 23, 2025, 04:44 PM ISTUpdated : Oct 29, 2025, 09:47 AM IST
Maruti Ertiga : GST कमी झाल्यामुळे मारुती एर्टिगाची किंमत कमी झाली आहे, ज्यामुळे ती मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी एक उत्तम 7-सीटर पर्याय ठरते. तसेच, तिचे स्मार्ट हायब्रीड इंजिन जास्त मायलेज आणि कमी मेंटेनन्सची खात्री देते.
GST कमी झाल्यानंतर मारुती एर्टिगाची किंमत कमी झाली आहे. बेस मॉडेल ₹8.80 लाख, तर टॉप मॉडेल ₹12.94 लाख (एक्स-शोरूम) आहे. ही मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी एक उत्तम 7-सीटर कार आहे. एवढेच नव्हे तर टुरिस्टसाठीही ही कार वापरली जाते. कुटुंबातील जास्तीत जास्त लोक या कारमधून प्रवास करु शकतात. त्यामुळे मोठ्या कुटुंबाची ही पहिली पसंती ठरत आहे.
24
फक्त ₹1.5 लाखांच्या डाउन पेमेंटवर
पूर्ण रक्कम भरण्याची गरज नाही. फक्त ₹1.5 लाख डाउन पेमेंट भरून, उरलेले ₹8.5 लाख कर्ज म्हणून घेऊ शकता. 5 वर्षांसाठी मासिक EMI सुमारे ₹17,655 असेल. म्हणजेच कमी ईएमआयमध्ये चक्क ७ सिटर कार घरी आणणे शक्य आहे.
34
इंजिन आणि परफॉर्मन्सची माहिती
मारुती एर्टिगा 1.5-लीटर स्मार्ट हायब्रीड पेट्रोल इंजिनसह येते. पॉवर: 101.65 bhp, टॉर्क: 136.8 Nm. ही पेट्रोल आणि CNG पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. यात 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आहे. एर्टिगामध्ये प्रशस्त जागा आणि आरामदायक सीट्स मिळतात. कौटुंबिक सहली आणि लांबच्या प्रवासासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. या गाडीच्या आत भरपूर जागा मिळते.
स्मार्ट हायब्रीड टेक्नॉलॉजीमुळे इंधनाचा खर्च कमी होतो. मारुती एर्टिगाची स्पर्धा टोयोटा रुमियन आणि रेनॉल्ट ट्रायबर सारख्या 7-सीटर गाड्यांशी आहे. विश्वासार्ह ब्रँड, कमी मेंटेनन्स खर्च आणि जास्त मायलेज ही तिची वैशिष्ट्ये आहेत. मारुतीचा विश्वास या गाडीत दिसतो. या गाडीचा अॅव्हरेजही चांगला आहे. ऑनरोड ही कार जास्त प्रवासी नसतील तर १८ ते २० चा अॅव्हरेज देते, जो या कारच्या श्रेणीत उत्तम आहे. तसेच १०० ते १२० च्या स्पीडनेही चालवल्यास ही कार स्थीर असते. समृद्धी हायवे सारख्या रस्त्यांवर सहज ही कार वेगात चालविली जाऊ शकते.