Bathing Before going to Bed : आजच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकजण दिवसभर कोणत्या ना कोणत्या कामात व्यस्त असतो. त्यामुळे शरीर आणि मन दोन्ही थकतात. सकाळी पुन्हा ताजेतवाने उठण्यासाठी, झोपण्यापूर्वी अंघोळ करणे आवश्यक आहे. याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.
आपल्या धावपळीच्या जीवनशैलीत दिवसभर काम आणि तणाव असतो. ऑफिस, कॉलेज, ट्रॅफिक, प्रदूषण यांमुळे शरीर आणि मन दोन्ही थकते. त्यामुळे रात्रीची अंघोळ फक्त स्वच्छतेसाठी नाही, तर आरोग्यासाठीही फायदेशीर आहे.
25
शरीराचे तापमान
रात्री अंघोळ केल्याने शरीराचे तापमान संतुलित होते. थंड किंवा कोमट पाण्याने अंघोळ केल्यास मेंदूला आरामाचा संकेत मिळतो. यामुळे शांत झोप लागते. निद्रानाश किंवा तणाव असलेल्यांसाठी हे खूप उपयुक्त आहे.
35
मानसिक शांतता
पाणी फक्त शरीरच नाही, तर आपले विचारही स्वच्छ करते. दिवसभराचा ताण, चिंता आणि निराशा कमी होते. रात्रीच्या अंघोळीमुळे मानसिक शांतता मिळते. यामुळे मज्जासंस्था शांत होते आणि हृदयाचे ठोके संतुलित होतात.
दिवसभर त्वचेवर धूळ, घाम आणि बॅक्टेरिया जमा होतात. रात्री अंघोळ केल्याने हे सर्व निघून जाते आणि त्वचेच्या समस्या टळतात. कोमट पाण्याने अंघोळ केल्यास स्नायू आणि नसांना आराम मिळतो.
55
केसांच्या आरोग्यासाठी
अनेकांना रात्री झोप न आल्याने मोबाईल पाहण्याची सवय असते. पण थंड पाण्याने अंघोळ केल्यास लवकर झोप येते. रात्री अंघोळ करणे केसांच्या आरोग्यासाठीही चांगले आहे. यामुळे केसांची मुळे मजबूत होतात.