Apple कंपनीची मोठी घोषणा, iPhone स्मार्टफोनमध्येही कॉल रेकॉर्ड करता येणार, जाणून घ्या सोपी ट्रिक

Published : Jun 11, 2024, 12:58 PM IST
pegasus iphone

सार

अ‍ॅप्पलने अखेर फोनमध्ये कॉल रेकॉर्डिंगच्या सुविधेची घोषणा केली आहे. या फिचरसाठी आयफोन युजर्स वेगवेगळ्या ट्रिक्स वापरायचे. पण आता थेट आयफोनमध्येच कॉल रेकॉर्डिंगचे फीचर उपलब्ध करुन दिले जाणार आहे.

Call Recording in iPhone : 10 जूनला झालेल्या Apple WWDC 2024 मध्ये काही महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या. कंपनीने iOS 18 ते अ‍ॅप्पल इंटेलिजेंसपर्यंतच्या सर्व गोष्टींबद्दल या इवेंटमधअये माहिती दिली आहे. दरम्यान, संपूर्ण कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण iPhone वर कॉल रेकॉर्डिंग करता येणार असल्याचे होते. म्हणजेच आता आयफोन युजर्सला कॉल रेकॉर्डिंग करता येणार आहे.

कंपनीने AI एन्हांस्ड कॉल रेकॉर्डिंचे फीचर दिले आहे. याचा थेट वापर आयफोनच्या अ‍ॅपमधून करता येणारे. यासाठी आता दुसऱ्या अ‍ॅपची गरज भासणार नाहीये. आयफोनवर कॉल रेकॉर्डिंग फीचर याआधी देण्यात आले नव्हते. यामुळेच काही युजर्सला कॉल रेकॉर्डिंगसंदर्भात समस्येचा सामना करावा लागत होता.

युजर्सच्या प्रायव्हेसीची काळजी
अ‍ॅप्पलचे सॉफ्टवेअर इंजिनिअर Craig Federighi यांनी आयफोनमधील कॉल रेकॉर्डिंग फीचरची माहिती दिली आहे. हे फीचर लवकरच आयफोन युजर्सला उपलब्ध करुन दिले जाणार आहे. यावेळी युजरला Call Recording चा ऑप्शन End आणि Mute बटणासोबत मिळणार आहे. यासाठी कंपनीकडून युजर्सच्या प्राव्हसेची देखील काळजी घेतली जाणार आहे.

अन्य काही फीचर्सही मिळणार
दरम्यान, कॉल रेकॉर्डिंग अथवा याचे नोटिफिकेशनचे फीचर केवळ iPhone to iPhone साठीच काम करणार की अन्य फोनवरही काम करणार याची माहिती नाही. हे कॉल रेकॉर्डिंग तुमचा कॉल संपल्यानंतर Notes अ‍ॅपमधून एक्सेस करता येऊ शकते.

याशिवाय अ‍ॅप्पलने आता ChatGPT ला Siri सोबत जोडले आहे. अशातच चॅटजीपीटीला सिरीच्या मदतीने प्रश्न विचारु शकता. हे फीचर वापरण्यासाठी युजरला प्रत्येकवेळी सिरीला चॅटजीपीटीसाठी परवानगी देणार आहे. लवकरच युजर्सला iOS 18 सोबत हे फीचर वापरता येणार आहे.

आणखी वाचा : 

Bird Flu मुळे जगात पहिला मृत्यू, जाणून घ्या H5N2 बद्दल सर्वकाही

आरोग्यासाठी गाय की म्हशीचे दूध सर्वाधिक उत्तम? जाणून घ्या सविस्तर

PREV

Recommended Stories

किया कंपनीची हि गाडी देते फ्लाईटसारखा फील, सोनेट गाडीवर मिळतोय भरघोस डिस्काउंट
Mahavitaran Bharti 2025 : तरुणांसाठी सुवर्णसंधी! महावितरणमध्ये 300 पदांवर मेगाभरती, दीड लाखांपर्यंत पगार; अर्ज कसा कराल?