फक्त उन्हाळ्यातच नाही, तर थंडीतही डिहायड्रेशन होते. या काळात आपल्या सभोवतालची हवा कोरडी असते. त्यामुळे शरीरातील पाणी कमी होऊन डिहायड्रेशन होऊ शकते.
थंडीच्या दिवसात हवेतील आर्द्रतेचे प्रमाण खूप कमी असते. त्यामुळे प्रत्येक श्वासासोबत तुमच्या शरीरातील पाण्याची पातळी कमी होते.
थंडीच्या दिवसात तहान खूप कमी लागते. त्यामुळे तुमच्या नकळत शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होऊन डिहायड्रेशन होऊ शकते.
थंडीत गरम पाणी पिणे टाळावे. यामुळे शरीर अधिक कोरडे होऊ शकते. त्यामुळे गरम पाणी पिणे टाळा.
थंडीच्या दिवसात त्वचा कोरडी होते. शरीराला आवश्यक असलेले पाणी न प्यायल्यास त्वचा आणखी कोरडी होण्याची शक्यता असते.
मधुमेह आणि किडनीचे आजार असलेल्या रुग्णांनी थंडीच्या दिवसात भरपूर पाणी पिण्याची विशेष काळजी घ्यावी.
Marathi Desk 3