2026 Maruti Brezza Facelift Spy Shots Reveal : मारुती सुझुकी लोकप्रिय एसयूव्ही ब्रेझाचे फेसलिफ्ट मॉडेल २०२६ मध्ये लाँच करण्याच्या तयारीत आहे. यामध्ये लहान डिझाइन बदलांसह, व्हेंटिलेटेड सीट्स, नवीन इन्फोटेनमेंट सिस्टीम यांसारखे मोठे बदल अपेक्षित आहेत.
मारुती सुझुकी आपली लोकप्रिय सब-4 मीटर एसयूव्ही ब्रेझाच्या फेसलिफ्ट व्हर्जनवर काम करत आहे. हे मॉडेल 2026 च्या सुरुवातीला लाँच केले जाऊ शकते. अलीकडेच समोर आलेल्या टेस्टिंगच्या फोटोंमध्ये नवीन ब्रेझामध्ये सीएनजी भरताना दिसले. एका यूट्यूब चॅनलने प्रसिद्ध केलेल्या फोटोंनुसार, कंपनी किरकोळ डिझाइन बदल आणि फीचर्समध्ये मोठे अपग्रेड करण्याची योजना आखत आहे. मात्र, इंजिन आणि गिअरबॉक्समध्ये कोणताही मोठा बदल अपेक्षित नाही. चला, नवीन ब्रेझामध्ये काय खास असेल ते सविस्तर जाणून घेऊया.
24
डिझाइन
ब्रेझा फेसलिफ्टमध्ये फार आक्रमक बाह्य बदल दिसणार नाहीत. हेडलॅम्प आणि टेललॅम्प सध्याच्या मॉडेलप्रमाणेच राहण्याची शक्यता आहे. एलईडी डीआरएलमध्ये नवीन पॅटर्न दिला जाऊ शकतो. पण, गाडी पूर्णपणे झाकलेली असल्यामुळे टेस्टिंग मॉडेलमध्ये ते स्पष्टपणे दिसले नाही. फ्रंट ग्रिल आणि फ्रंट-रिअर बंपरला नवीन डिटेलिंग मिळू शकते, ज्यामुळे एसयूव्हीला अधिक फ्रेश लूक मिळेल. साइड प्रोफाइल बॉक्सीच राहील, पण नवीन अलॉय व्हील्स मिळण्याची शक्यता आहे.
34
केबिनमध्ये मोठे बदल
रिपोर्ट्सनुसार, ब्रेझा फेसलिफ्टमध्ये सर्वात मोठे बदल केबिनमध्ये पाहायला मिळतील. यामध्ये नवीन किंवा अपडेटेड स्टीयरिंग व्हील दिले जाऊ शकते, असे म्हटले जात आहे. याशिवाय, टीएफटी इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, व्हेंटिलेटेड सीट्स, पॉवर्ड ड्रायव्हर सीट, सुधारित ॲम्बियंट लायटिंग आणि प्रीमियम ऑडिओ सिस्टम यांसारखी फीचर्सही जोडली जाऊ शकतात. सर्वात मोठे अपग्रेड 10.1-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम असू शकते.
कारच्या पॉवरट्रेनबद्दल बोलायचे झाल्यास, ब्रेझा फेसलिफ्टमध्ये सध्याचे K15C स्मार्ट हायब्रीड पेट्रोल इंजिन कायम ठेवले जाण्याची शक्यता आहे. हे इंजिन 103.1 bhp पॉवर आणि 139 Nm टॉर्क निर्माण करते. याचे मायलेज 17.80 ते 19.89 किमी/लीटर आहे. सीएनजी व्हेरिएंट फेसलिफ्ट मॉडेलमध्येही कायम राहील, जे 25.51 किमी/किलो मायलेज देते. रिपोर्ट्सनुसार, सीएनजी व्हर्जनमध्ये अंडरबॉडी सीएनजी किट दिले जाऊ शकते, ज्यामुळे बूट स्पेसची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होईल.