
आयर्लंड संघाच्या विरोधात भारताचा पराभव झाल्यामुळं संघाची पुढील वाटचाल खडतर झाली आहे. आता संघ इंग्लंड संघाच्या विरोधात टी २० सामने खेळायला मैदानात उतरणार आहे. वैभव सूर्यवंशीला या सामन्यात संघात स्थान मिळत का नाही याकडं सर्व चाहत्यांच लक्ष लागून राहील आहे. इंग्लंड संघाच्या विरोधात वैभवला संघात स्थान देण्यात येईल असं सांगण्यात आलं आहे.
वैभव सूर्यवंशीच्या संघातील आगमनाबद्दल यावेळी सुनील गावस्कर यांनी मत व्यक्त केलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, आयर्लंड संघाच्या विरोधातील पहिल्या सामन्यात वैभव सूर्यवंशीला स्थान देण्यात येईल. वैभवची सर्वात खास गोष्ट म्हणजे त्याला इंग्लंडच्या गोलंदाजांनी अजून खेळताना पाहिलेलं नाही. वैभव हे खेळायला निडर असल्याचं आपल्याला आयपीएलमध्ये दिसून आलं आहे.
वैभव हे सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड तोडणार का याकडं सर्वांचं लक्ष लागून राहील आहे. वैभव आता फक्त १५ वर्षांचे असून त्यांच्याकडं संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष लागून राहील आहे. आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्ल्सकडून खेळताना त्यांनी चांगला खेळ केला होता. सचिनचा सर्वात कमी वयात पदार्पण करण्याचा विक्रम वैभव तोडतो का याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.
क्रिकेट बातम्या (Cricket News): Get the latest and in-depth cricket news in Marathi, including live updates, scores and key developments from IPL and other major cricket series, only on Asianet Marathi News.