
वैभव सूर्यवंशीच्या नावाचा क्रिकेट जगतामध्ये एक दबदबा निर्माण झाला आहे. त्यानं ज्या प्रकारे श्रीलंका संघाला पाणी पाजलं ते क्रिकेटमध्ये अनेक वर्ष आठवणीत ठेवलं जाईल. १५ वर्षीय खेळाडूने आपल्या बॅटीच्या तडाख्यातून स्वतःला सिद्ध करून दाखवलं आहे. त्यानं फक्त २९ चेंडूंमध्ये ९४ धावांची खेळी करून श्रीलंकन खेळाडूंना सातवे आसमान दाखवून दिलं.
सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये वैभवला सूर गवसत नव्हता. पण त्यानं शेवटच्या सामन्यात अशी बॅट फिरवली कि प्रेक्षक सामना बघतच राहिले. वैभव शंभरच्या घरात येऊन आउट होत होता. यावेळी त्यानं ९४ धावा काढून भारतासाठी ३७८ धावांचा डोंगर उभा करून दिला. वैभवच्या याच फलंदाजीचे सर्वच स्तरातून कौतुक केलं जात आहे.
सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला असून यामध्ये एक श्रीलंकन फॅन दिसत आहे. एक श्रीलंकन चाहता त्याच्याकडं पाहतो आणि बोलतो की, तो आला, लढला, मारलं आणि जाळून निघून गेला. हे शब्द बोलत असताना त्या श्रीलंकन फॅनच्या चेहऱ्यावरचं दुःख दिसून येत आहे. हा व्हिडीओ सुनील गावस्कर यांच्या एक्स खात्यावरून पोस्ट करण्यात आला.
वैभवच्या सूर्यवंशीच्या २९ बॉलमध्ये ९४ धावांमुळे पूर्ण सामन्याचा रंगच बदलून गेला. त्याच्यानंतर आलेल्या तिलक वर्मा आणि ऋतुराज गायकवाड यांच्या फलंदाजीमुळे भारताने ३७७ धावा बनवल्या. भारताने ६६ धावांच्या फरकाने हा सामना जिंकला. वैभव सूर्यवंशीच्या याच खेळामुळं त्याच सर्वच स्तरातून कौतुक केलं जात आहे.
क्रिकेट बातम्या (Cricket News): Get the latest and in-depth cricket news in Marathi, including live updates, scores and key developments from IPL and other major cricket series, only on Asianet Marathi News.