
भारतीय महिला क्रिकेट संघाचा t20 वर्ल्ड कप सामने सुरू आहेत. एक जून रोजी झालेल्या सामन्यात भारताचा दक्षिण आफ्रिका कडून पराभव झाला. त्यामुळे गट 1ची गुणतालिका पूर्णपणे बदलून गेली आहे. भारताला या एका पराभवामुळे सेमी फायनलला जाता येईल का नाही हा प्रश्न पडला आहे. ऑस्ट्रेलिया संघाने सुरुवातीचे तीनही सामने जिंकून या गटांमध्ये अव्वल स्थान मिळवलं. दुसरीकडे दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश यांचे गुण समान आहेत. चांगल्या रन रेटमुळे आफ्रिकन संघ तिसऱ्या स्थानावर आहे.
भारतीय संघाच्या अडचणी वाढल्या असून समोर बांगलादेश आणि ऑस्ट्रेलिया सारख्या संघांचे आव्हान तयार झालं आहे. पहिल्या गटातून फक्त दोनच संघ नॉक आउट फेरीसाठी पात्र ठरतील. भारताने जर पुढील ऑस्ट्रेलिया विरुद्धचा सामना हरला तर आपल्याकडे फक्त सहा गुण उरंतील आणि उपांत्य फेरीचा मार्ग कठीण होईल.
दुसरीकडे आफ्रिकन संघासाठी आता सोपं गणित झालं आहे. त्यांनी दोन्ही सामने जिंकले तर त्यांचे आठ गुण होऊन उपांत्य फेरीसाठी ते प्रबळ दावेदार बनतील. परिस्थिती सध्या पूर्णपणे भारताच्या विरोधात नाही. ऑस्ट्रेलिया पाकिस्तान आणि भारत विरुद्ध चे आपले पुढील दोन सामने हरले तर चित्र पूर्णपणे बदलू शकते.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना एकतर्फी झाला. या सामन्यामध्ये भारताने प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिका संघासमोर 159 धावांचे लक्ष ठेवले. प्रत्युतरात दक्षिण आफ्रिका संघाकडून खेळणाऱ्या कॅप या खेळाडूने 81 धावा केल्यामुळे दक्षिण आफ्रिका संघ पाच चेंडू राखूनच सामना जिंकला. राधा यादवने कॅपचे दोन झेल सोडले. त्यामुळे तिने याचा पुरेपूर फायदा घेऊन आपल्या संघाला सामना जिंकून दिला.
क्रिकेट बातम्या (Cricket News): Get the latest and in-depth cricket news in Marathi, including live updates, scores and key developments from IPL and other major cricket series, only on Asianet Marathi News.