Asia Cup 2025 India vs Pakistan : आशिया कप स्पर्धेतील ग्रुप स्टेजचे सामने संपले असून आता सुपर-4 फेरीचे सामने सुरू झाले आहेत. आज भारत-पाकिस्तान सामना होणार आहे. हा सामना तुम्ही मोफत पाहू शकता. तो कसा पाहायचा, याबद्दलची उत्सुकता असेल तर उत्तर इथे आहे.
आशिया कप स्पर्धेच्या ग्रुप स्टेजमध्ये आमनेसामने आलेले भारत आणि पाकिस्तान संघ, आता सुपर-4 फेरीत पुन्हा एकदा भिडण्यासाठी सज्ज झाले आहेत. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय मैदानावर होणार आहे.
26
मागील सामन्यात भारताचा सहज विजय
पहिल्या सामन्यात सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने 7 विकेट्सने सहज विजय मिळवला होता. यावेळी दोन्ही संघांमध्ये जोरदार उत्साह होता. भारताने पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला होता. सामना संपल्यानंतरही दोन्ही संघांमधील कटूता बघायला मिळाली होती.
36
भारत आणखी एका विजयाच्या प्रतीक्षेत
आता भारतीय संघ आणखी एका विजयासाठी उत्सुक आहे आणि चाहते हा सामना पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत. या सामनात भारताने पाकिस्तानला मात दिली तर आजच भारतात दिवाळी साजरी केली जाईल. कारण या विजयासह सलग दोन सामन्यांमध्ये विजय मिळवल्याला भारतीयांना आनंद असेल.
आज संध्याकाळी 8 वाजता सुरू होणारा हा हाय-व्होल्टेज सामना सोनी स्पोर्ट्स टीव्ही चॅनलवर थेट पाहता येईल. तसेच, सोनी लिव्ह आणि फॅनकोड या ओटीटी प्लॅटफॉर्मवरही पाहता येईल.
56
पैसे देऊन मॅच पाहण्याचे प्लॅटफॉर्म
सोनी स्पोर्ट्स चॅनल पाहण्यासाठी आणि सोनी लिव्ह व फॅनकोडवर सामने पाहण्यासाठी पैसे देऊन सबस्क्रिप्शन घ्यावे लागते. त्यामुळे यासाठी तुम्हाला काही रक्कम अदा करावी लागेल. त्यानंतर सामन्याचा आस्वाद घेता येईल.
66
इंडो-पाक मॅच मोफत पाहा
तुम्ही डीडी स्पोर्ट्सवर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना मोफत पाहू शकता. ही गोष्ट बऱ्याच लोकांना माहीत नाही. डीडी स्पोर्ट्स हे एक मोफत चॅनल आहे. तुमच्या टीव्हीवर ते कोणत्या क्रमांकावर दिसते ते माहिती करुन घ्या. यामुळे तुम्हाला पेड चॅनल सबस्क्राईब करण्याची गरज भासणार नाही.