Asia Cup 2025 IND vs PAK : सामना मॅनेज असल्याचा क्रिकेट रसिकांना संशय, वाचा या मागील बाबी

Published : Sep 15, 2025, 01:29 AM IST

Asia Cup 2025 IND vs PAK दुबईत झालेला भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक वादळ निर्माण करून गेला. हा सामना पाहताना अनेकांना तो खऱ्या सामन्यापेक्षा रजनीकांतच्या एखाद्या नाट्यमय चित्रपटाची आठवण करून गेला.

PREV
13
सामन्याला सुरुवात होण्यापूर्वीच तो चर्चेचा केंद्रबिंदू

सुरुवातीपासूनच या सामन्यावर राजकीय वादळ उठले होते. शिवसेना (ठाकरे गट) यांनी या सामन्याला तीव्र विरोध दर्शवला. "पाकिस्तानशी सामना खेळणे म्हणजे शहीदांच्या बलिदानाचा अपमान आहे" अशा घोषणांनी मुंबईसह महाराष्ट्रातील विविध ठिकाणी ठाकरे गटाचे आंदोलने झाली. मात्र या आंदोलनात नेहमी आक्रमक भुमिकेत दिसणारी महाराष्ट्र निर्माण सेना मात्र अनुपस्थित राहिली.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या सामन्याविरोधात आणखी एक गंभीर आरोप लावला. त्यांनी सांगितले की, या सामन्यामागे कोट्यवधी रुपयांचा खेळ आहे. "मोठ्या रकमा खर्च करून सामना भारताच्या बाजूने झुकवला जाईल," असा त्यांचा दावा होता. त्यामुळे सामन्याला सुरुवात होण्यापूर्वीच तो चर्चेचा केंद्रबिंदू बनला होता.

23
हशा, गोंधळ आणि वाद

सामना सुरु होण्याआधीच रंगत वाढवणारी काही घटना घडल्या. भारतीय फलंदाज सूर्यकुमार यादवने पाकिस्तानी कर्णधाराशी हस्तांदोलन करण्यास नकार दिला. त्याचबरोबर, सामन्याच्या सुरवातीला अपेक्षित असलेले पाकिस्तानचे राष्ट्रगीत वाजवले गेले नाही. त्याऐवजी मैदानात अचानक "जलेबी बेबी" हे गाणे लावण्यात आले. चूक लक्षात आल्यावर पाकिस्तानचे राष्ट्रगीत वाजले, आणि त्यामुळे हशा, गोंधळ आणि वाद निर्माण झाला.

खेळ सुरू झाल्यानंतर मात्र भारताने पूर्ण वर्चस्व गाजवले. भारतीय संघाने सहज विजय मिळवला आणि चाहत्यांना आनंद दिला. सामन्यानंतर सूर्यकुमार यादवने हा विजय भारतीय लष्कराला समर्पित करून सैनिकांप्रती आदर व्यक्त केला.

33
मुंबईचा शांत चेहरा

मात्र या सर्व गोंधळात सर्वात आश्चर्यचकित करणारी गोष्ट म्हणजे सामन्यानंतरचा मुंबईचा शांत चेहरा. साधारणपणे पाकिस्तानवर विजय मिळाल्यानंतर रस्त्यावर जल्लोष, ढोल-ताशे आणि फटाक्यांची आतषबाजी सुरू होते. पण यावेळी पहिल्यांदाच भारतीय क्रिकेटप्रेमी रस्त्यावर उतरले नाहीत. विजय झाला तरी शहराने तो विजय शांतपणे स्वीकारला.

या सामन्याने फक्त क्रीडा नव्हे तर राजकीय आरोप-प्रत्यारोप, राष्ट्रभक्तीचे उद्गार, नाट्यमय प्रसंग आणि चाहत्यांच्या वेगळ्या प्रतिक्रिया अशा अनेक पैलू उलगडले. त्यामुळे अनेकांनी प्रश्न विचारला – हा सामना खरोखर भारत-पाकिस्तान क्रिकेटचा होता, की रजनीकांतच्या एखाद्या ब्लॉकबस्टर चित्रपटाचा?

Read more Photos on

Recommended Stories