भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद सिरजने ऑगस्ट महिन्याचा आयसीसी पुरस्कार जिंकला आहे. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याच्या आक्रमक गोलंदाजीमुळे भारताला मालिका बरोबरीत सोडवता आली. त्यामुळे त्याचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.
इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत उत्कृष्ट गोलंदाजी केल्याबद्दल भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला आयसीसीचा पुरस्कार मिळाला आहे. त्याला ऑगस्ट महिन्यासाठी 'सर्वोत्कृष्ट खेळाडू' म्हणून निवडण्यात आले आहे. ऑगस्टमध्ये इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या ओव्हल कसोटीत नऊ विकेट्स घेऊन भारताच्या अविस्मरणीय विजयात सिराजने महत्त्वाची भूमिका बजावली होती.
24
आयसीसी पुरस्कार जिंकलेला मोहम्मद सिराज
भारताने पाच सामन्यांची कसोटी मालिका २-२ अशी बरोबरीत आणली, ज्यात त्यांनी इंग्लंडला सहा धावांनी हरवून चमकदार कामगिरी केली. या सामन्यात एकूण ४६ षटके टाकलेल्या सिराजला 'सामनावीर' म्हणूनही निवडण्यात आले. आयसीसीच्या ऑगस्ट महिन्याच्या पुरस्कारासाठी न्यूझीलंडचा खेळाडू मॅट हेन्री आणि वेस्ट इंडिजचा खेळाडू जेडेन सील्स हे सिराजचे प्रतिस्पर्धी होते.
34
पुरस्कार जिंकल्याने सिराज आनंदी
या सर्व खेळाडूंना हरवून सिराजने हा पुरस्कार जिंकला, ज्यामुळे त्याला खूप आनंद झाला आहे. ''आयसीसीचा ऑगस्ट महिन्यासाठी सर्वोत्कृष्ट खेळाडू निवडल्याबद्दल मला अभिमान वाटतो. इंग्लंडविरुद्ध खेळणे माझ्या आयुष्यातील सर्वात रोमांचक मालिका होती. संघाच्या विजयात योगदान देऊ शकल्याचा मला अभिमान वाटतो, विशेषतः शेवटच्या कसोटीतील माझ्या कामगिरीमुळे मी खूप आनंदी आहे,'' असे सिराजने सांगितले.
भारतीय संघातील सहकाऱ्यांनी दिलेल्या सततच्या प्रोत्साहनामुळेच ही कामगिरी शक्य झाली, असेही सिराज म्हणाला. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत पाचही कसोटी सामने खेळणाऱ्या सिराजने २३ विकेट्स घेऊन मालिकेत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या खेळाडूंपैकी एक होता. त्याने दोन वेळा पाच विकेट्स घेण्याचा पराक्रमही केला. इंग्लंडविरुद्धची पाच सामन्यांची कसोटी मालिका ओव्हल कसोटीत सहा धावांनी जिंकून भारताने २-२ अशी बरोबरी साधली, हे विशेष.