वरळीतील दोन ड्युप्लेक्ससाठी तब्बल 639 कोटींचा व्यवहार; भारताच्या इतिहासातील सर्वात महागड्या अपार्टमेंट खरेदीचा विक्रमी सौदा

Published : May 30, 2025, 09:27 AM IST
Worli Sea Face

सार

Mumbai : वरळीतील दोन सी-फेसिंग ड्युप्लेक्स अपार्टमेंट्ससाठी कोट्यावधी रुपयांची खरेदी झाल्याचे समोर आले आहे. खरंतर, अपार्टमेंट्स तब्बल 639 कोटींना खरेदी करण्यात आले आहेत.

Mumbai : मुंबईतील रिअल इस्टेटमधील किमती सातत्याने चर्चेचा विषय ठरत आहेत. अलीकडेच वरळीतील दोन सी-फेसिंग ड्युप्लेक्स अपार्टमेंट्सचा विक्रमी दराने झालेला विक्री व्यवहार चर्चेत आहे. तब्बल ६३९ कोटी रुपयांमध्ये झालेला हा सौदा भारताच्या इतिहासातील सर्वात महागडा रेसिडेन्शियल अपार्टमेंट व्यवहार ठरला आहे.

वरळी सी-फेसवरील ४० मजली ‘नमन झाना’ या लक्झरी इमारतीतील ३२व्या आणि ३५व्या मजल्यावरील दोन ड्युप्लेक्स अपार्टमेंट्सचा हा विक्री व्यवहार आहे. एकूण क्षेत्रफळ २२,५७२ चौरस फूट असून, याचे दर प्रति चौरस फूट २.८३ लाख रुपये इतके आहेत.

कोण आहे खरेदीदार?

फार्मा क्षेत्रातील दिग्गज लीना गांधी तिवारी, ज्या USV प्रायव्हेट लिमिटेड या औषधनिर्मिती कंपनीच्या चेअरपर्सन आहेत, त्यांनी ही दोन अल्ट्रा लक्झरी मालमत्ता खरेदी केली आहे. केवळ स्टॅम्प ड्युटी आणि जीएसटीसाठी त्यांनी ६३.९ कोटी रुपये खर्च केले आहेत. त्यामुळे एकूण व्यवहाराची किंमत जवळपास ७०३ कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे.

दक्षिण-मध्य मुंबईतील वरळी भाग सध्या लक्झरी रिअल इस्टेटचा हॉटस्पॉट बनला आहे. अरबी समुद्राचा आकर्षक नजारा, तसेच वांद्रे व नरिमन पॉइंट या व्यावसायिक केंद्रांच्या जवळ असल्यामुळे या परिसरात किंमती गगनाला भिडत आहेत. याशिवाय, कोस्टल रोड व सी-लिंक एक्सटेंशन सारख्या प्रकल्पांमुळे येथील मालमत्तांची मागणी अधिक वाढणार आहे.

मागील महिन्यातही मोठा व्यवहार चर्चेत

मे २०२५ च्या सुरुवातीलाच बँकर उदय कोटक यांनी वरळीतील एक संपूर्ण सी-फेसिंग इमारत सुमारे ४०० कोटी रुपयांना विकत घेतल्याचे वृत्त चर्चेत होते. विशेषतः एप्रिल २०२४ मध्ये मुंबईत आजवरची सर्वाधिक मालमत्ता नोंदणी झाली असून, लक्झरी रिअल इस्टेट मार्केटमध्ये अभूतपूर्व वाढ होत असल्याचे स्पष्ट होत आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

आजपासून विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन, पहिल्याच दिवशी 4 मोठे मोर्चे, 4 आत्महत्यांचे गंभीर इशारे, 15 धरणे आंदोलन, 9 उपोषणे
अरुंद एक्झिट, ताडाच्या पानांची रचना, मोठी DJ नाईट गोव्याच्या नाईटक्लबमधील किंकाळ्यांना जबाबदार!