
Thane : भारतीय नौदलाच्या सुरक्षेसाठी अत्यंत संवेदनशील मानल्या जाणाऱ्या डॉकयार्डमधून पाकिस्तानी गुप्तहेर महिलेला गोपनीय माहिती पुरविल्याप्रकरणी ठाण्यातील कळव्यातून एका अभियंत्याला अटक करण्यात आली आहे. या अभियंत्याने हनी ट्रॅपच्या जाळ्यात अडकून माहिती दिली असून, त्याच्या खात्यात पाकिस्तानातून मोठी रक्कम जमा झाल्याचेही समोर आले आहे.
अभियंता रविकुमार वर्मा अटकेत
राज्य दहशतवादविरोधी पथक (एटीएस) मुंबई युनिटने रविकुमार वर्मा (वय ३५, रा. कळवा, ठाणे) याला गुरुवारी अटक केली. वर्मा गेली चार वर्षे मुंबईतील डॉकयार्डमध्ये कनिष्ठ अभियंता तंत्रज्ञ म्हणून ठेकेवर कार्यरत होता. त्याच्यावर शासकीय गुपिते अधिनियम व यूएपीए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नोव्हेंबर २०२४ मध्ये फेसबुकच्या माध्यमातून वर्मा याची पाकिस्तानी इंटेलिजन्स ऑपरेटिव्हशी (PIO) ओळख झाली. त्यानंतर व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून ती महिला त्याच्याशी जवळीक साधत गेली आणि हळूहळू भारत सरकारने प्रतिबंधित केलेल्या क्षेत्रांतील संवेदनशील व गोपनीय माहिती वर्माकडून मिळवू लागली.
नोव्हेंबर २०२४ ते मार्च २०२५ या कालावधीत वर्मा याने पीआयओला सातत्याने गोपनीय माहिती पाठवत होता. या बदल्यात त्याच्या बँक खात्यात पाकिस्तानातून मोठी रक्कम जमा झाल्याची माहिती चौकशीत समोर आली आहे. सद्यस्थितीत, त्याला ही रक्कम कोणाकडून, किती व कशा स्वरूपात मिळाली याचा तपास एटीएस करत आहे.वर्मा याच्याच संपर्कातील इतर दोन जणांनाही अटक करण्यात आली आहे. या तिघांविरोधात शासकीय गुपिते अधिनियम व यूएपीए अंतर्गत कठोर कारवाई करण्यात येत आहे.
पूर्वीची हनी ट्रॅप प्रकरणे