ठाकरे कुटुंबातील 'हा' क्षण पाहून राज ठाकरेंच्या आईच्या डोळ्यात आलं टचकन पाणी, तुम्ही म्हणाल अरे देवा हे कसं झालं?

Published : Oct 17, 2025, 10:00 PM IST

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे: मुंबईतील शिवाजी पार्क येथे मनसेने आयोजित केलेल्या दीपोत्सवात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही बंधू एकत्र दिसले. त्यांच्यासोबत त्यांचे संपूर्ण कुटुंबही उपस्थित होते. 

PREV
16
ठाकरे कुटुंबातील 'हा' क्षण पाहून राज ठाकरेंच्या आईच्या डोळ्यात आलं टचकन पाणी, तुम्ही म्हणाल अरे देवा हे कसं झालं?

मुंबईतील शिवाजी पार्कवर दरवर्षी दीपोत्सवाचे आयोजन करण्यात येत असते. या दीपोत्सवाच्या निमित्ताने ठाकरे बंधूंचे मनोमिलन परत पाहायला मिळाले. ते पाहून समस्त मराठीजन जनता सुखावली आहे.

26
कार्यक्रमासाठी कोण कोण उपस्थित होतं?

या कार्यक्रमासाठी राज ठाकरे, उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, शर्मिला ठाकरे, आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे हे उपस्थित होते. यावेळी हे सगळं पाहून राज ठाकरेंच्या आईच्या डोळ्यात पाणी आलं होतं. हे दृश्य डोळ्यात साठवून घ्यावं असच होतं.

36
दीपोत्सवाला उद्धव ठाकरे यांनी लावली हजेरी

दीपोत्सवाला उद्धव ठाकरे यांनी हजेरी लावल्यामुळे सगळ्यांच्या भुवया वर झाल्या होत्या. हा दीपोत्सव ठाकरे बंधूंच्या कार्यकर्त्यांसाठी नवंचैतन्य देणारा ठरला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने याचे आयोजन केलं आहे.

46
किती दिवस हा कार्यक्रम चालणार?

हा कार्यक्रम १७ ते २६ ऑक्टोबर दरम्यान चालणार आहे. १७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६:३० वाजता या कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. मनसेच्या या कार्यक्रमाचे १३ वे वर्ष असून याठिकाणी तरुण तरुणी मोठ्या प्रमाणावर येत असतात.

56
मान्यवर लावतात हजेरी

या कार्यक्रमाला मान्यवर दरवेळी हजेरी लावत असतात. २०२३ मध्ये जावेद अख्तर यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. मागच्या वर्षी म्हणजेच २०२४ मध्ये रोहित शेट्टी आणि सिंघम चित्रपटाची टीम येऊन गेली होती.

66
ठाकरे बंधू दिसले एकत्र

ठाकरे बंधू परत एकदा एकत्र दिसून आले. या उदघाटनाला अमित-आदित्य आणि दोन्ही जावा रश्मी-शर्मिला हे एकाच गाडीतून प्रवास करताना दिसून आले. यावेळी कोणीही राजकीय भाष्य केलं नाही.

Read more Photos on

Recommended Stories