Mumbai Local Journey Safe: महिलांनो, लोकलमध्ये संकट येताच फक्त एक मेसेज करा; मदतीला धावून येणार 'सखी'! जाणून घ्या नेमकं काय आहे हे नवीन फिचर

Published : Apr 09, 2026, 07:45 PM IST

Mumbai Local Journey Safe: मुंबईच्या पश्चिम रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेसाठी रेल्वे सुरक्षा बलाने (RPF) सखी हा व्हॉट्सअॅप उपक्रम सुरू केला. याअंतर्गत संकटाच्या वेळी महिलांनी ग्रुपवर मेसेज करताच RPF जवान मदतीला धावून येणारय. 

PREV
16
महिलांनो, लोकलमध्ये संकट येताच फक्त एक मेसेज करा; मदतीला धावून येणार 'सखी'!

मुंबई: मुंबईची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या लोकलने प्रवास करणाऱ्या लाखो महिलांसाठी आता प्रवास अधिक सुरक्षित आणि निर्भय होणार आहे. चर्चगेट ते डहाणू या पट्ट्यात प्रवास करणाऱ्या महिलांसाठी रेल्वे सुरक्षा बलाने (RPF) 'सखी' हा अनोखा व्हॉट्सअॅप उपक्रम सुरू केला आहे. आता रेल्वे डब्यात छेडछाड किंवा इतर कोणत्याही संकटात महिलांना थेट पोलिसांची मदत एका क्लिकवर मिळणार आहे. 

26
काय आहे हा 'सखी' उपक्रम?

महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी पश्चिम रेल्वेने एकूण ११ विशेष व्हॉट्सअॅप ग्रुप्स तयार केले आहेत. या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक ग्रुपचे नेतृत्व महिला उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकारी करत आहेत. सध्या १५०० हून अधिक नियमित महिला प्रवासी या ग्रुपशी जोडल्या गेल्या असून, हा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. 

36
संकटाच्या वेळी कशी मिळणार मदत?

जर डब्यात पुरुषांची घुसखोरी झाली, चोरीचा प्रयत्न झाला किंवा छेडछाड होत असेल, तर महिला प्रवाशांना फक्त त्या घटनेचा फोटो आणि स्थानकाचे नाव ग्रुपवर टाकायचे आहे. मेसेज मिळताच पुढील १ ते २ स्थानकांमध्ये आरपीएफचे जवान संबंधित डब्यात हजर होऊन तातडीने कारवाई करतील. व्हॉट्सअॅपमुळे फोटो आणि लाईव्ह लोकेशन शेअर करणे सोपे झाल्याने गुन्हेगारांना पकडणे पोलिसांसाठी अधिक सोपे झाले आहे. 

46
घुसखोर पुरुषांवर आरपीएफचा 'सर्जिकल स्ट्राईक'

केवळ ग्रुप बनवून रेल्वे थांबलेली नाही, तर प्रत्यक्षात मोठी कारवाई देखील करण्यात आली आहे. गेल्या सहा महिन्यांत महिलांच्या डब्यात बेकायदेशीरपणे शिरणाऱ्या ६,१९५ पुरुषांवर कारवाई करण्यात आली आहे. या घुसखोरांकडून तब्बल १३ लाख ८४ हजार १०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. 

56
'रेल मदत' सोबतच आता 'सखी'ची साथ

रेल्वे सुरक्षा आयुक्त रजत कुंडगीर यांच्या कल्पनेतून हा प्रकल्प साकारला आहे. रेल्वेचा १३९ हा हेल्पलाईन क्रमांक आधीच कार्यरत आहे, मात्र 'सखी' ग्रुपमुळे महिलांना थेट महिला अधिकाऱ्यांशी संवाद साधता येत असल्याने महिला प्रवाशांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

66
महिलांसाठी टीप

जर तुम्ही पश्चिम रेल्वेचे नियमित प्रवासी असाल, तर तुमच्या विभागातील 'सखी' ग्रुपमध्ये सहभागी होऊन आपला प्रवास अधिक सुरक्षित बनवा!

RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Photos on

Recommended Stories